आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सर्वात उंच हॉटेल उभारून दुबईने मोडले स्वतःचेच विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबईत असल्याची माहिती जवळपास सर्वांनाच आहे. आता दुबईने आपल्या नावे आणखी एक विक्रम नोंदवला आहे. दुबईने तब्बल 356 मीटर उंच असे हॉटेल उभारले आहे. हॉटेल गेव्होरा असे त्याचे नाव असून ते जगातील सर्वात उंच हॉटेल आहे. यापूर्वी हा विक्रम नोंदवणाऱ्या जेडब्लू मॅरिएट हॉटेल एक मीटर कमी उंच आहे. तसेच ते 2013 मध्ये बांधण्यात आले होते. 

 

असे आहे हॉटेल गेव्होरा...
होटल गेव्होरामध्ये 75 सोनेरी मजले आहेत. यात एकूण 528 खोल्या आहेत. प्रत्येक खोली युनीक पद्धतीने सजवणयात आली आहे. हॉटेल गेव्होरा शेख झायद रोडवर दुबई इंटरनॅशनल फायनान्स सेंटरजवळ आहे. याचे बांधकाम माजिद अल अत्तर यांनी केले. 2020 मध्ये यूएई ग्लोबल ट्रेड फेअर एक्सपोचे संमेलन याच ठिकाणी होणार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील सर्वात उंच हॉटेलचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...