आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 200 टन सोन्यासह 113 वर्षांपूर्वी बुडालेले रशियन जहाज समुद्रात सापडले, 8 लाख कोटी रुपये असू शकते किंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> दिमित्री दोन्सकोई नावाचे हे जहाज सोन्याची निर्यात करण्यासाठी निघाले होते.
> जपानला ते ताब्यात घ्यायचे होते, परंतु त्याआधीच ते बुडाले.
> जहाजाचे अवशेष ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत समुद्राबाहेर येतील.

 

सेऊल - दक्षिण कोरियाच्या बचाव पथकाने एका अशा रशियन जहाजाचे अवशेष शोधून काढल्याचा दावा केला आहे, ज्यात 200 टन सोने असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची किंमत 130 बिलियन डॉलर (तब्बल 8 लाख कोटी रुपये) असू शकते. ब्रिटिश वृत्तपत्र डेली टेलिग्राफनुसार, जहाजाचे अवशेष दक्षिण कोरियाई द्विप उलुंगडोजवळ 1400 फूट खोलीवर आढळले. रशियन इम्पिरियल नेव्हीचे सोन्याने भरलेले दिमित्री दोन्सकोई नावाचे हे जहाज 1905 मध्ये बुडाले होते.

 

रिपोर्टनुसार, जहाजाचे अवशेष शोधण्यात दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि कॅनडाच्या टीम एकत्र काम करत होत्या. या टीम्सनी अवशेषाचे फोटो काढण्यासाठी दोन पाणबुड्यांचा वापर केला. यात आढळले की, 1905 मध्ये जपानशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान दोन्सकोईचे मोठे नुकसान झाले होते.

 

अजूनही दबून आहे सोने: 
रिपोर्ट्सनुसार, रशियन जहाजावर सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांनी भरलेले 5500 बॉक्स होते. जपानला यावर ताबा मिळवायचा होता, परंतु यापूर्वीच हे जहाज बुडाले. जहजा शोधून काढणाऱ्या सेऊलच्या शिनिल ग्रुपला जहाजाचे अवशेष ऑक्टोबर वा नोव्हेंबरपर्यंत बाहेर काढण्याची अपेक्षा आहे. कंपनीने म्हणणे आहे की, जितकेही सोने बाहेर येईल त्यातील अर्धे रशियाला सोपवले जाईल. सोन्यातून मिळणाऱ्या 10% रकमेतून उलुंगडो द्विपावर म्युझियम स्थापले जाईल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...