आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यार्पणाबाबत झाकीर म्हणाला-वृत्त खोटे, सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत भारतात परतणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलेशिया - वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाबाबतच्या बातम्या खऱ्या नसल्याचे स्वतः नाईकने म्हटले आहे. उलट सध्याला भारतात परतण्याचा काहीही विचार नसल्याचे झाकीर नाईकने म्हटले आहे. एका वृत्त वाहिनेने मलेशियातील पोलिसाच्या हवाल्याने झाकीर नाईक आज भारतात परतणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सगळीकडे या बातम्या सुरू झाल्या. मात्र झाकीर नाईक यांनीच हे वृत्त फेटाळल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. दरम्यान एनआयए या राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रवक्ते अलोक मित्तल यांनीही अद्याप अशी माहिती नसल्याचे म्हटले आहे. 


काय म्हणाला झाकीर..
एएनआयनुसार झाकीर नाईकने म्हटले आहे की, मी भारतात येत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि बिनबुडाच्या आहेत. जोपर्यंत भारतात माझ्या विरोधात प्रामाणिकपणे खटला चालण्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत भारतात येण्याचा विचार नसल्याचे झाकीर म्हणाला. ज्या दिवशी मला माझ्याविरोधात प्रामाणिकपणे खटला चालवण्याची जाणीव होईल, तेव्हा मी नक्की परत येईल, असे झाकीर म्हणाला. 


झाकीर नाईकवर मनी लाँडरींग, चिथावणीखोर भाषणे आणि विविध कार्यक्रमांतून धार्मिक भावना भडकावणे, चिथावणीखोर भाषण करणे अशा प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत. 

 

कोण आहे झाकीर नाईक?
- झाकिरचा जन्म 18 ऑक्टोबर 1965 रोजी मुंबईत झाला होता.
- त्याने एमबीबीएस पदवी घेतली आहे. झाकीर एक मुस्लिम धर्मगुरु, रायटर आणि प्रवक्ता आहे.
- याशिवाय तो इस्लामिक रिसर्च फाउंडेशन अर्थात आयआरएसचा संस्थापकीय अध्यक्ष आहे.
- फेसबुकवर त्याचे 1 कोटींच्या वर फॉलोअर आहेत. झाकीरवर यूके, कॅनडा, मलेशियासह 5 देशांमध्ये बंदी आहे.
- इस्लामिक फाउंडेशनला देश-विदेशातून भरपूर निधी मिळतो.
- तो एक शाळा चालवत होता. त्यात लेक्चर, ट्रेनिंग, हाफिज बनवण्यासाठी क्लास आणि इस्लामिक ओरिएंटेशन प्रोग्राम चालवतो.
- पोलिसांकडून परवानगी न मिळाल्याने 2012 नंतर त्याने मुंबईत कोणतीही कॉन्फ्ररन्स घेतली नाही.

 

 

बातम्या आणखी आहेत...