आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये एक दिवसांत 1.94 मी. बर्फवृष्टी, 37 वर्षांचा विक्रम मोडीत, सात जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- अमेरिका, फ्रान्स आणि रशियानंतर आता जपान प्रचंड बर्फवृष्टीमुळे त्रस्त आहे. जपानच्या इशिकावा प्रांतात बुधवारपासून गुरुवारपर्यंतच्या २४ तासांत १.९४ मीटर बर्फवृष्टी झाली, हा विक्रम आहे. याआधी १९८१ मध्ये १ दिवसांत १.३४ मीटर बर्फवृष्टी झाली होती. 

 

> ४० सेंमी बर्फवृष्टी होकुरिकूत 

> ३०  सेंमी बर्फवृष्टी तोहोकूत 

 

५६ अपघात  
रस्त्यांवरील बर्फामुळे इशिकावा, फुकेई, तोयामा, निगाता प्रांतात ५० पेक्षा जास्त अपघात झाले. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला. ३४ जण जखमी झाले. तीन दिवसांपासून ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सचे १००० पेक्षा जास्त जवान बचाव कार्यात तैनात आहेत. 

 

 

तीन दिवसांपासून वाहतूक ठप्प 
बर्फामुळे फुकेई प्रांताच्या एका महामार्गावर तीन दिवसांपासून २० किमी लांब वाहनांच्या रांगा आहेत. त्यात १४०० पेक्षा जास्त बस, कार अडकल्या आहेत. २००० लोक या वाहनांत अडकले आहेत. हवामान विभागानुसार, सध्या बर्फवृष्टीपासून सुटकेची चिन्हे नाहीत. 


पुढील स्‍लाइडवर पाहा फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...