आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्हीसाठी आठवड्यातून 1 गोळी; सध्याची उपचार पद्धती क्लिष्ट, नव्या गोळीचा प्रभाव अधिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्टन- एचआयव्ही संसर्गासाठीची उपचार पद्धती दीर्घ आणि क्लिष्ट असून आता यातून सुटका होण्याचे संकेत मिळाले आहेत. संशोधकांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आठवड्यातून एकदाच डोस घेण्यासाठी एक गोळी शोधली आहे. रुग्णाला आता आैषधांचे वेळापत्रक सक्तीने पाळण्याचे बंधन राहणार नाही, असा दावा संशोधकांनी केला आहे. आठवड्यातून एकदा ही गोळी घेणे पुरेसे ठरेल. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे यावर संशोधन झाले. आठवडाभर ही गोळी विषाणू प्रतिबंधाचे काम करेल.  


या गोळीचा आकार चांदणीसारखा आहे. कॅप्सूल रूपात ती उपलब्ध होईल आणि त्याचे कोटिंग मऊ आहे. चांदणीच्या ६  त्रिकोणात (भुजांमध्ये)  डोस असून हळूहळू त्याचा प्रभाव शरीरात सुरू होतो. एकाच गोळीत अनेक पिलबॉक्स असल्यासारखी ही रचना आहे. या गोळीची चाचणी यशस्वी झाली आहे. याची रचना डोसचा योग्य खुराक मिळावा या दृष्टीने चांदणीसारखी केली आहे. दररोज आैषध घेण्यापेक्षा ही पद्धत अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला. दक्षिण आफ्रिकेतील आकडेवारीनुसार येत्या २० वर्षांत २ ते ८ लाख नव्या एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांना वाचवण्यात यश मिळेल.  

 

संसर्ग रोखण्यास सक्षम 
एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णासाठी ही नवी गोळी उपयुक्त आहेच, शिवाय याचा संसर्ग होण्याची शक्यता असणाऱ्या रुग्णासाठीदेखील ती प्रभावी ठरेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. पहिल्या टप्प्यात एचआयव्हीला रोखणे हे सर्वात मोठे आव्हान होते, असे संशोधक जियोव्हानी ट्रॅव्हर्सो यांनी म्हटले आहे. जियोव्हानी ट्रॅव्हर्सो  हे बायोमेडिकल इंजिनिअर म्हणून ब्रिगहॅम वुमेन्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. डोस कमी करून त्याचा परिणाम वाढवण्याकडे या संशोधनादरम्यान लक्ष देण्यात आले. जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये हा संशोधन अहवाल सादर केला आहे.  

बातम्या आणखी आहेत...