आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mission Accomplished: थायलंडच्या गुहेतून कोचसह सर्व फुटबॉलर्स बाहेर, जगभर जल्लोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थाम लुआंग केव्ह (थायलंड)- थायलंडच्या १० किमी लांब गुहेत अडकलेली चार मुले व त्यांच्या प्रशिक्षकाला सुरक्षित बाहेर काढले आहे. यासोबत जगातील सर्वात मोठ्या जोखमीच्या बचाव मोहिमेचा सुखद शेवट झाला आहे. असे असले तरी बचाव पथकातील चार पाणबुडे व डॉक्टर्सचे पथक येणे बाकी आहे. १२ फुटबॉल खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक २३ जूनला या गुहेत अडकले होते. मात्र, गुहेच्या प्रवेश द्वारात पाणी शिरल्यामुळे सर्व अडकले.

 

पुराचे पाणी व दलदलीत फसण्यापासून वाचण्यासाठी टीम गुहेच्या ४ किमी आत एका उंचवट्यावर थांबली होती. गुहेत त्यांची सायकल, सामग्री व पावलांच्या खुणा दिसल्यानंतर मुले गुहेतच असल्याचे उघड झाले. दलदल व पाण्याने भरलेल्या या गुहेत यानंतर सर्वात जोखमीची आंतरराष्ट्रीय बचाव मोहीम सुरू झाली. अखेर २ जुलैला ब्रिटिश पाणबुडे त्यांच्यापर्यंत पाेहोचले. या मोहिमेत ब्रिटन, अमेरिका, जपान, चीन, ऑस्ट्रेलियातील सर्वात निष्णात पाणबुड्यांनी भाग घेतला.  

 

हे ही वाचा.... यामुळे जिवंत वाचले सगळे फुटबॉलर्स


पंतप्रधान म्हणाले, मुले आणण्याआधी चिंता दूर करणारे औषध दिले होते  
थायलंडच्या पंतप्रधानांनी सांगितले की, मुलांनी या प्रक्रियेला घाबरू नये, यासाठी त्यांना बाहेर आणण्याच्या आधी चिंता निवारण करणारे औषध दिले होते. हे औषध सैनिकही घेतात. लक्ष केंद्रित झाल्यास शार्प शूटिंग चांगले होते. असे असले तरी मुलांना बेशुद्ध करून बाहेर आणल्याचे वृत्त खोटे आहे.  


सोमवारपर्यंत काढलेली सर्व ८ मुले शारीरिक-मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त  
गुहेतून सोमवारपर्यंत बाहेर काढण्यात आलेली सर्व ८ मुले शारीरिक-मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. त्यांचे एक्सरे व रक्त नमुन्याचा अहवाल ठीक आहे. असे असले तरी दोन मुलांच्या फुप्फुसात संसर्ग झाल्याची शक्यता असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना ७ दिवस रुग्णालयात ठेवले जाईल.  


दोन आठवडे काळोखात राहिल्यामुळे मुलांना सनग्लास घातला आहे  
मुले दोन आठवड्यांपर्यंत गुहेतील काळोखात राहिली आहेत. त्यामुळे त्यांना सनग्लास घातलेला आहे. या मोहिमेत थायलंडच्या ४० व विदेशातील ५० पाणबुड्यांनी भाग घेतला. त्यांच्यासाठी ही आव्हानात्मक मोहीम होती. त्यांचे चेहरे मुखवट्याने झाकलेले होते.

बातम्या आणखी आहेत...