आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इंडोनेशियामध्ये 15 करार; व्यापार 3.4 लाख कोटीं रूपयांपर्यंत नेणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी मध्य जकार्तातील अर्जुनाचा विजयरथही पाहिला. इंडोनेशियात सुमारे ८७% मुस्लिम लोकसंख्या आहे. - Divya Marathi
मोदींनी मध्य जकार्तातील अर्जुनाचा विजयरथही पाहिला. इंडोनेशियात सुमारे ८७% मुस्लिम लोकसंख्या आहे.

जकार्ता -  पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ दिवसांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी इंडोनेशियात होते. तेथे त्यांनी अध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. जोको १२ तासांत ५ पेक्षा जास्त वेळा मोदींना भेटले. दोन्ही देशांत शिक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ, सुरक्षा, व्यापार, रेल्वे, आरोग्य, गुंतवणुकीसहित १५ करारांवर स्वाक्षरी केली. त्याशिवाय द्विपक्षीय व्यवसाय पुढील ७ वर्षांत तिप्पट वाढवण्यावरही सहमती झाली.

 

दोन्ही देश २०२५ पर्यंत व्यापार ३.४० लाख कोटी रु.पर्यंत नेणार आहेत. २०१७ मध्ये १.२४ लाख कोटी रु. चा व्यापार झाला होता.  मोदी आणि जोको यांनी रामायण-महाभारत संकल्पनेवर बनवलेल्या पतंग महोत्सवातही भाग घेतला. दोघांनी सोबत पतंग उडवला. त्यानंतर मोदींनी इंडोनेशियाची प्रसिद्ध इस्तिकलाल मशीदही पाहिली. त्यांनी मध्य जकार्तातील अर्जुनाचा रथही पाहिला. मोदींनी भारतीय समुदायाला संबोधित केले. तत्पूर्वी, अध्यक्षांच्या मर्डेका पॅलेसमध्ये मोदींचे स्वागत करण्यात आले. 

 

भारत हा इंडोनेशियाचा सर्वात निकटचा सहकारी देश : मोदी 
मोदींनी जकार्तात भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करताना संयुक्त सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत सरकारची कामगिरी सांगितली. ते म्हणाले की, एकेकाळी तुमच्या पूर्वजांना परिस्थितीमुळे भारत सोडावा लागला होता. ४ वर्षांत भारताने जगाला पुढे नेण्यात सक्रिय भूमिका बजावली आहे. जगातील सर्वात खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक भारतात विक्रमी विदेशी गुंतवणूक होत आहे. भारतात तुमचे स्वागत आहे. भारत-इंडोनेशियात फक्त ९० सागरी मैलांचे अंतर आहे. म्हणजे इंडोनेशियाचा सर्वात जवळचा शेजारी देश भारतच आहे.  

 

सध्या दोन्ही देशांच्या व्यापारात ८०% हिस्सा इंडोनेशियाचा  
इंडोनेशिया आसियान देशांत भारताचा सर्वात मोठा भागीदार देश आहे. इंडोनेशिया केंद्रीय सांख्यिकी संस्थेनुसार, २०१६ मध्ये दोन्ही देशांत १ लाख कोटी रु. चा व्यापार झाला होता. त्यात २०१७ मध्ये २८.७% वाढ झाली होती. गेल्या वर्षी इंडोनेशियाने भारताला ८७,७२० कोटी रु. चे साहित्य निर्यात, तर २७,५४० कोटी रु.चे आयात केले होते. दोन्ही देश संरक्षण व्यापार वाढवण्यावर सहमत झाले.

 

जगात सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या इंडोनेशियात राहते  
इंडोनेशियाची सध्याची लोकसंख्या २६ कोटी आहे. त्यात ८७% लोक मुस्लिम आहेत. ती जगात सर्वाधिक आहे. १९७८ मध्ये बनलेली इस्तिकलाल मशीद आग्नेय आशियातील सर्वात मोठी मशीद आहे. इस्तिकलालचा अर्थ आहे स्वातंत्र्य. आग्नेय आशियातील अनेक देशांत रामायण, महाभारत ग्रंथ भारताप्रमाणेच प्रसिद्ध आहेत.  इंडोनेशिया हाही त्या देशांपैकी एक देश आहे.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...