आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्पविरोधात 16 महिलांचा लैंगिक अत्याचाराचा आरोप; सिनेटर्सची चौकशीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेत लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर काही सिनेटर्सनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत. त्यांची चौकशी करण्याची मागणी मंगळवारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ५४ महिला सदस्यांनी संसदीय समितीकडे पत्राद्वारे केली आहे.  


राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात अनेक महिलांना आरोप लावले आहेत. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. ट्रम्प यांच्यावरील आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. डेमोक्रॅटिक सिनेटर क्रिस्टन गिलीब्रँड यांनी सोमवारी ट्विट करून ट्रम्प यांच्या राजीनाम्याची मागणी केली. खासदार ब्रेंडा लॉरेन्स म्हणाल्या, सर्वांना न्याय मिळायला हवा. आरोपी कोणीही असला तरी कायद्यापुढे सर्व समान अाहेत. या प्रकरणात कायद्यानुसार चौकशी झाली पाहिजे. ट्रम्प यांच्याविरोधात गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान १६ महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यापैकी तीन महिलांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन संसदीय समितीद्वारे चौकशीची मागणी केली होती.  

 

आरोपांवर जनतेने उत्तरे दिली : व्हाइट हाऊस
राष्ट्राध्यक्षांच्या बचावासाठी व्हाइट हाऊसच्या प्रसार माध्यम प्रमुख सारा सँडर्स सरसावल्या. राष्ट्राध्यक्षांनी सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांच्यावर हे आरोप झाले होते. परंतु या देशातील जनतेने ट्रम्प यांचे समर्थन करून त्यांना विजयी केले. त्यामुळे ट्रम्प यांच्या विजयातूनच जनतेने आरोपांचे उत्तर दिल्याचे सँडर्स यांनी म्हटले आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...