आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील शाळेत माजी विद्यार्थ्याचा गोळीबार, 17 ठार; आरोपी माजी विद्यार्थी अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील सर्वात सुरक्षित फ्लोरिडा प्रांतात मियामीजवळ पार्कलँडच्या स्टोनमन डग्लस हायस्कूलमध्ये बुधवारी एका माजी विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यासह १७ जण ठार तर १२ हून अधिक जखमी आहेत. हल्लेखोर निकोलस क्रुझ (१९) याला अटक करण्यात आली. अाराेपी क्रुझवर पूर्वनियाेजित हत्येचे १७ अाराेप लावण्यात अाले अाहेत. सप्टेंबर महिन्यात त्याने यूट्यूबवर प्राेफेशनल स्कूल शूटर बनू इच्छित असल्याचा मेसेज टाकला हाेता. याची माहिती शाळेने एफबीअायलाही दिली हाेती, मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. अाईच्या निधनानंतर त्याच्या वागण्यात बदल जाणवत हाेता. त्याच्यावर मानसिक उपचारही सुरू हाेते. जवळ काडतूस सापडल्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकले हाेते.


शाळेतून काढल्यामुळे रागात होता आरोपी.. 
- न्यूज एजन्सीच्या मते ही घटना मियामीपासून सुमारे 72 किमी अंतरावर असलेल्या पार्कलंड परिसरातील मार्जरी स्टोनमॅन डगलस हायस्कूलमध्ये सुटीपूर्वी घडली. 
- आरोपी विद्यार्थ्याला शिस्तभंगामुळे शाळेतून काढून टाकण्यात आले होते, त्यामुळे तो रागात होता. 


फायर अलार्म वाजवून केले फायरिंग 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आधी शाळेचा फायर अलार्म वाजवला. त्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. त्या गोंधळाचा फायदा घेत विद्यार्थ्याने फायरिंग केले. 


AR-15 असॉल्ट रायफलचा वापर 
- पोलिसांच्या मते, आरोपी विद्यार्थ्याने या घटनेमध्ये AR-15 असॉल्ट रायफलचा वापर करण्यात आला. 
- या घटनेनंतर आरोपी विद्यार्थ्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही तर उलट शांतपणे शरणागती पत्करली. 


आधी शाळेबाहेर फायरिंग 
- आरोपी क्रूजने आधी शाळेबाहेर फायरिंग केले. त्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो इमारतीत घुसला आणि 12 जणांची हत्या केली. 
- घटनेमध्ये ठार झालेल्या 12 जणांचा मृत्यू शाळेत तर दोघांचा इमारतीबाहेर झाला. एका व्यक्तीने रस्त्यावर तर दोन जखमींनी रुग्णालयात प्राण गमावले. 


अमेरिकेतील शाळेत फायरिंगची 18 वी घटना 
- एका गन कंट्रोल ग्रुपच्या माहितीनुसार अमेरिकेच्या शाळांमध्ये फायरिंग होण्याची ही 18 वी घटना आहे. त्यात आत्महत्या आणि अशाही घटनांचा समावेश आहे ज्यात हानी झाली नाही. 
- जानेवारी महिन्यातच बेनटॉनजवळच्या एका शाळेत एका 15 वर्षीय तरुणाने केलेल्या फायरिंगमध्ये 2 ठार झाले होते. 


गन कल्चर संपवण्यासाठी रडले होते ओबामा 
- दोन वर्षांपूर्वी ऑरेगॉनच्या कॉलेजमध्ये नऊ जणांची हत्या केल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना रडू कोसळले होते. 
- ते म्हणाले होते, जर आज आपण पावले उचलली नाहीत, तर अशा घटना थांबणार नाही. या मुलांबद्दल विचार करून मी वेडा होतो. आपण गन पॉलिसी आणायला हवी. पण अमेरिकन संसदेतील 70 टक्के खासदार गन कल्चरच्या समर्थनात होते. त्यामुळे ओबामांचा नाइलाज झाला. 

 

US मध्ये जवळपास 31 कोटी शस्त्रे, 66% लोकांकडे एकापेक्षा अधिक बंदूक 
- जगभरातील एकूण सामान्य नागरिकांकडे अशलेल्या गन्सपैकी 48% केवळ अमेरिकन्सकडे आहे. त्यांची संख्या सुमारे 31 कोटी आहे. 
- 89% अमेरिकन लोक सोबत ठेवतात बंदूक. त्यापैकी 66% लोक एकापेक्षा जास्त लोक बंदूक बाळगतात. 
- अमेरिकेतील बंदूक तयार करणाऱ्या इंडस्ट्रीचे वार्षिक उत्पन्न 91 हजार कोटींचे आहे. 2.65 लाख लोक या व्यवसायाशी संबंधित आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेच शस्त्रविक्रीतून 90 हजार कोटी रुपये येतात. 
- दरवर्षी येथे एक कोटींपेक्षा अधिक रिव्हॉल्व्हर, पिस्तुल बंदूक विकल्या जाताता. 

ट्रम्प यांनी व्यक्त केला शोक 
- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घटनेबाबत ट्वीट करून शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले फ्लोरिडातील गोळीबारातील पीडितांबरोबर माझ्या संवेदना आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फायरिंगनंतरचे PHOTOS...

 

बातम्या आणखी आहेत...