आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-श्रीलंका संबंधांच्या 195 फाइल ब्रिटनने केल्या नष्ट, संशोधक-अभ्यासकांची चिंता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारत-श्रीलंका यांच्यात सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धातील तणाव-संघर्षाचा इतिहास सांगणारे दस्तऐवज ब्रिटनने नष्ट केल्याचे उजेडात आले आहे. तेव्हा श्रीलंकेत गृहयुद्ध सुरू होते. लिट्टे समर्थकांनी देशांत आपले आंदोलन तीव्र केले होते. त्यावरून हिंसाचारही झाला होता. ब्रिटनच्या निर्णयामुळे संग्राहक तसेच अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे.  


देशाच्या   संग्रहविषयक धोरणावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्या धोरणानुसार अनावश्यक वाटणारे दस्तऐवज नष्ट केले जातात. कारण ऐतिहासिकदृष्ट्या अशा दस्तऐवजांचे महत्त्व राहिलेले नसते. त्यामुळे असा निर्णय घेतला जातो, असे ब्रिटनच्या परराष्ट्र व राष्ट्रकुलविषयक कार्यालयाने स्पष्ट केले. ‘श्रीलंका-इंडिया रिलेशन फ्रॉम १९७९ व १९८०’ असे नष्ट करण्यात आलेल्या दस्तऐवजाचे नाव आहे. पत्रकार तसेच अभ्यासक फिल मिलर यांचे म्हणणे आहे. कारण या फाइल सापडत नसल्यामुळे मिलर यांनी एक अर्ज करून त्याबद्दलची माहिती मिळवली. त्यात फाइल हरवल्याचे स्पष्ट झाले.  


वास्तविक ऐतिहासिक दस्तऐवजाच्या संग्रहालयातून काही कागदपत्रे नष्ट होणे ही राष्ट्रीय संग्रहालयाची हानी असते. त्याचा फटका सर्वांनाच बसतो. खरे तर ही कृती बेकायदा आहे, असे वैरमुत्तू वरदकुमार यांनी म्हटले आहे. तामिळ इन्फॉर्मेशन सेंटरचे ते संस्थापक आहेत. पामच्या पानांवरील हस्तलिखिते श्रीलंकेच्या लष्कराने १९८१ मध्ये जाफना गं्रथालयास पेटवून दिले होते.


त्यानंतर बंडखोर तमिळ युनायटेड लिबरेशन फ्रंटने श्रीलंकेच्या सैन्याविरोधात हल्ले केले होते. त्यात १३ श्रीलंकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दंगल उसळली होती. त्यानंतर काही वर्षांत श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षंची हत्याही झाली होती. संघटनेचा प्रमुख प्रभाकरणच्या मृत्यूनंतर हा संघर्ष थंडावला. श्रीलंकेत तमिळ भाषिक व सिंहली भाषिक यांच्यातील संघर्षाला सुरूवात पन्नासच्या दशकापासूनच झाली होती.  तत्पूर्वी देशाचे नाव सिलोन बदलून श्रीलंका झाले.

 

‘तामिळ भाषिकांविषयी रुचीत झाली वाढ’  
ब्रिटनमध्ये तामिळ भाषिकांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे अलीकडच्या काळात वाढली आहे. तामिळी इतिहास काय आहे, राजकारण आणि श्रीलंकेतील तामिळ यांच्याबद्दलचे ब्रिटनमधील जनतेत कुतूहल आहे. त्यामुळे अशा प्रकारे दस्तऐवज नष्ट करण्याचे काम चुकीचे आहे, असे वरदकुमार यांनी सांगितले. 

 

राष्ट्रीय संग्रहालयाचा नियम काय ?  : ब्रिटनमध्ये सार्वजनिक दस्तऐवजांच्या जतनीकरणाचा कायदा आहे. त्यानुसार सर्व सरकारी विभाग आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचे मूल्यांकन करून ते राष्ट्रीय संग्रहालयाकडे पाठवतात. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे कायमस्वरूपी जतन करायचे का ? याविषयी निर्णय घेतला जातो. परराष्ट्र तथा राष्ट्रकुल कार्यालयाच्या शिफारशीनंतरच कागदपत्रांचे काय करायचे हे ठरवले जाते, असा दावा कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी केला. 

 

बातम्या आणखी आहेत...