आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 29 Years On The World Wide Web; Founding Team Lei Said, We Make The Internet Dangerous As The Weapon

वर्ल्ड वाइड वेबला 29 वर्षे पूर्ण; संस्थापक टीम ली म्हणाले, इंटरनेटला आपण शस्त्रधारी माणसाप्रमाणे धोकादायक बनवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- वर्ल्ड वाइड वेबला २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मार्च १९८९ मध्ये टीम बर्नर्स ली यांनी रॉबर्ट साइलाऊ यांच्या सोबतीने पहिली संकल्पना मांडली होती. वर्ल्ड वाइड वेबचे ३० व्या वर्षात पदार्पण झाल्या निमित्ताने टीम बर्नर्स ली यांनी इंटरनेटच्या भविष्यावर ब्लॉग लिहिला. आपण सध्या इंटरनेटच्या रूपात शस्त्रांची निर्मिती करत आहोत. इंटरनेट म्हणजे  शस्त्रअस्त्राने सज्ज असलेल्या माणसाप्रमाणे धोकादायक होणार आहे. अर्धे जग इंटरनेटशी जोडले गेले असले तर उर्वरित अर्धे जग इंटरनेटपासून लांब राहते. ही बाब चिंताजनक आहे. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूचे संस्थापक टीम यांच्या ब्लॉगमधील काही महत्त्वाचा सारांश...  

 

गरीब, ग्रामस्थ आणि महिलांना ऑनलाइन आणल्यास खरे यश मिळेल : टीम ली

वर्ल्ड वाइड वेबला २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. ३० व्या वर्षात एक अनोखे यश प्राप्त होणार आहे. या वर्षी जगातील निम्मी लोकसंख्या ऑनलाइन आली. पण उर्वरित निम्मी लोकसंख्या ऑनलाइन कशी येणार आणि सध्याचे इंटरनेट पाहता निम्मी लोकसंख्या ऑनलाइन येऊ इच्छिते की नाही हे दोन महत्त्वाचे प्रश्न आपल्यासमोर आहेत. सर्वांना सहज आणि मोफत उपलब्ध व्हावे तसेच सर्जनशीलतेला वाव मिळावा म्हणून वेबची निर्मिती केली गेली. परंतु सध्या चित्र बदलताना दिसत आहे. वेबच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याने सर्जनशीलतेची बाजू येथेच संपुष्टात येते. इंटरनेट मोफत मिळण्यात अनेक अडथळे आहेत. जगात अनेक असे देश आहेत जेथे मिळकतीच्या १-२ टक्के रक्कम खर्च केल्यावरच लोकांना चांगल्या स्पीडसह १ जीबी डाटा मिळतो. परंतु झिम्बॉब्वे आणि तत्सम आफ्रिकी देशात १ जीबी डाटासाठी लोकांना मिळकतीच्या २० टक्के रक्कम द्यावी लागते. इंटरनेटच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. इंटरनेटच्या रूपात आपण शस्त्राची निर्मिती करत आहोत. इंटरनेट म्हणजे शस्त्र घेऊन उभ्या असलेल्या एखाद्या धोकादायक माणसाप्रमाणे आहे. हा धोका टाळण्यासाठी व्यवसाय, तंत्रज्ञान, सरकार, मनोरंजन, शिक्षण क्षेत्रातील प्रतिभाशाली लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. गरीब, ग्रामस्थ आणि महिलांना आपण ऑनलाइन आणू शकलो तरच यश मिळाले असे मानता येईल.

बातम्या आणखी आहेत...