आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओटावा - भारतात डॉक्टरांनी आपले मानधन आणि वेतन वाढवण्यासाठी काम बंद आणि आंदोलन छेडल्याचे आपण नेहमीच ऐकतो. पण, जगात असेही एक ठिकाण आहे. जेथे डॉक्टर आपल्या पगारवाढीला विरोध करत आहेत. एवढेच नव्हे, तर विरोध करताना ते आंदोलनाला बसले आहेत. 500 अधिक डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग घेतला तसेच पगारवाढ परत घेण्याची मागणी केली.
कॅनडातील क्युबेक राज्य सरकारने डॉक्टरांचा पगार वाढवण्यासाठी 5 हजार कोटींचा बजेट मंजूर केला. 2017-18 मध्ये याचा फायदा मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या सरकारी रुग्णालयातील 750 डॉक्टरांना झाला. पण, त्या डॉक्टरांनी वाढीव पगार घेण्यास नकार दिला. तसेच 500 हून अधिक डॉक्टरांनी आंदोलन करताना एक ऑनलाइन मोहिम सुरू केली. आम्हाला पूर्वीपासूनच भरभक्कम पगार आहे असे डॉक्टरांनी म्हटले तसेच ते पगारवाढीचा विरोध का करत आहेत, याचे कारण देखील दिले.
पुढच्या स्लाइडवर वाचा, या आंदोलनावर सरकारचे काय म्हणणे आहे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.