आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा भरला 'वर्ल्ड नेकेड बाइक राइड'चा उत्सव; अशी झाली होती सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - इंग्लंडच्या ब्राइटन शहरात सोमवारी शेकडोंच्या संख्येने लोक आपले सर्व कपडे काढून सायकल राइडसाठी उतरले. ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार, या वर्षी या जागतिक नग्न सायकल रॅलीत 550 जणांनी सहभाग नोंदवला. या नग्न सायकल रॅलीला पोलिसांची अधिकृत परवानगी मिळाली आहे. एवढेच नव्हे, तर 2006 पासून दरवर्षी खंड न पडता हा फेस्टिव्हल साजरा केला जातो. ही बाइक (सायकल) रॅली प्रत्यक्षात एक मोहिम आहे. तसेच दरवर्षी होणाऱ्या या आयोजनाचा एक हेतू सुद्धा आहे.


कार संस्कृतीच्या विरोधासाठी झाली सुरुवात...
- ब्रायटन शहरात सर्वप्रथम 2006 मध्ये या फेस्टिव्हलची सुरुवात झाली. यात शेकडो लोक आपले सगळेच कपडे काढून सायकलस्वारी करताना दिसून आले होते. त्यांच्या शरीरावर विरोध प्रदर्शनाचे स्लोगन लिहिले होते. देशात सायकलस्वारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी याची सुरुवात झाली. तसेच यातून कार संस्कृती व प्रदूषणाचा निषेध करत पर्यावरण जपण्याचा संदेशही देण्यात आला. 
- आयोजकांनी आपल्या आंदोलनाकडे लोकांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सायकल राइड न्यूड ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या न्यूड सायकल रॅलीला परवानगी नव्हती. 2007 मध्ये आयोजक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर त्यास अधिकृत परवानगी देण्यात आली. प्रशासनाच्या परवानगीने गेल्या 13 वर्षांपासून दरवर्षी हे फेस्टिव्हल आयोजित केले जाते. 
- या फेस्टिव्हलचे अनुकरण अमेरिकेसह युरोपियन देशांत सुद्धा केले जाते. त्या ठिकाणी सुद्धा आरोग्य आणि निसर्ग जपण्याचे संदेश देतात. यामध्ये सहभागी होणारे लोक आपल्या शरीरावर आणि चेहऱ्यावर विविध प्रकारचे रंग, चमक आणि बॉडी पेंटिंग करून येतात. 
- दरवर्षी प्रमाणेच ब्रायटन शहरातून निघणारी ही सायकल रॅली ब्रायटनच्या सागरी किनाऱ्यापर्यंत जाते. याच ठिकाणी सायकल रॅलीत सहभागी झालेले लोक एकत्रित येतात आणि सगळे मिळून सागरात न्यूड बाथ घेतात. 


पुढील स्लाइड्सवर आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...