आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नेत्याचा निकाह पाहून आपणही म्हणाल, याची तर लॉटरीच लागली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानी नेते इम्रान खान यांचा तिसरा निकाह सध्या चर्चेत आहे. त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी 5 मुलांची आई असलेली आपलीच धर्मगुरू बुशरा हिच्याशी निकाह केला. अशात बांग्लादेशच्या नेत्याच्या निकाहचा किस्सा पुन्हा जागा झाला आहे. 4 वर्षांपूर्वी बांग्लादेशच्या 67 वर्षीय रेल्वे मंत्र्याने 29 वर्षीय तरुणीशी विवाह केला होता. त्यांच्या लग्नाचे फोटोज सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुरुवातीला काहींनी ते फोटो खोटे असल्याचा दावा केला. मात्र, हे लग्न खरेखुरे होते हे नंतर स्पष्ट झाले.

 

मालदीवला केला हनीमून
2014 मध्ये रेल्वेमंत्री राहिलेले मुजीबुल हक यांनी आपल्या वयाच्या तुलनेत 38 वर्षे लहान असलेल्या मुलीशी विवाह केला. एवढेच नव्हे, तर आपल्या 29 वर्षीय पत्नीला 67 वर्षीय मंत्री हनीमूनसाठी मालदीवला घेऊन गेले होते. त्यांच्या या विवाहाची चर्चा जगभरात झाली. 2016 मध्ये या कपलने एका मुलीला जन्म दिला. बांग्ला डेलीच्या वृत्तानुसार, त्यांनी मेहरमध्ये 4 लाख रुपये बांधले होते. तसेच आपल्या मेव्हणीला गिफ्ट म्हणून जवळपास 1 लाख रुपये दिले होते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्यांच्या लग्नाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...