आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे आपल्याच लोकांवर हल्ले करतेय सरकार! चिमुकल्यांची अशी अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सीरियातील बंडखोर नियंत्रित भाग दूमा येथे संशयित रासायनिक हल्ला झाल्याचे रविवारी समोर आले आहे. या हल्ल्यात चिमुकल्यांसह 70 जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेकांवर उपचार सुरू आहेत. बचाव मोहिम राबविणारी संस्था व्हाइट हेलमेटने ट्वीट करून ही माहिती जाहीर केली. सोबतच कथित रासायनिक हल्ल्यानंतर मृत आणि जखमींचे फोटो सुद्धा पोस्ट केले. पण, कुठल्याही अधिकाऱ्याने या हल्ल्याच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला नाही. विशेष म्हणजे, व्हाइट हेलमेटने यापूर्वी 150 जणांच्या मृत्यूचा दावा करणारे ट्वीट केले होते. पण, काही वेळातच ते ट्वीट डिलीट करण्यात आले.

 

या संस्थेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो जारी केले आहेत. त्यामध्ये चिमुकली मुले श्वास घेण्याचा संघर्ष करताना दिसून आले. लहान-लहान मुलांच्या नाक आणि तोंडात स्प्रे मारून डॉक्टर त्यांना श्वास घेण्यासाठी मदत करत होते. तर एक मुलगा थंडीने थर-थर करत होता, त्याला एक ब्लँकेट देऊन कोपऱ्यात बसवण्यात आले. अनेक माता आपल्या मुलांना कुशीत घेऊन उपचाराची प्रतीक्षा करत होत्या.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हृदयाचा ठोका चुकवणारे पीडितांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...