आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90 मिनिटांत सोडवला 70 वर्षांचा वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे उन यांनी हॉटेलच्या उद्यानात सोबत फेरफटकाही मारला. - Divya Marathi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे उन यांनी हॉटेलच्या उद्यानात सोबत फेरफटकाही मारला.

नव्या संबंधांमुळे जगात होईल शांतता व समृद्धी प्रस्थापित  
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे प्रमुख किम जाेंग उन यांच्यातील पहिली शिखर बैठक मंगळवारी सिंगापूरमध्ये झाली. मी ट्रम्प व किम उन यांनी कोरिया प्रदेशात नवीन संबंध प्रस्थापित करणे, स्थायी शांततेसाठी व्यापक, सखोल व प्रामाणिक विचारांचे आदान-प्रदान करण्यावर आम्हा उभयतांत सहमती झाली. मी ट्रम्प उत्तर कोरियाला सुरक्षेची हमी देतो. उन यांनी कोरियातील अण्वस्त्र नष्ट करण्याविषयीची बांधिलकी व्यक्त केली. या नवीन संबंधामुळे कोरिया क्षेत्रात व जगात शांतता व समृद्धीत योगदान मिळेल. ट्रम्प व किम यांच्यात परस्पर आत्मविश्वासाद्वारे अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी मदतही होऊ शकेल.

 

दोन्ही देशांतील नागरिकांच्या इच्छेनुसार शांतता व समृद्धी तसेच चांगले संबंधासाठी उभय देश कटिबद्धता व्यक्त करत आहोत. स्थायी व दीर्घकालीन शांततेसाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही आम्ही व्यक्त करतो आहोत. २७ एप्रिल २०१८ रोजी पनमुंजोम अाण्विक केंद्र बंद करून उत्तर कोरियाने कोरिया क्षेत्राला अण्वस्त्रमुक्त करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते. अमेरिका व उत्तर कोरिया दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच ही शिखर बैठक झाली. त्यामुळे दोन्ही देशांत दशकांपासून सुरू असलेला तणाव निवाळणे आणि शत्रुत्व विरून जाऊ शकेल. मी ट्रम्प व किम उन या कराराच्या तत्काळ अंमलबजावणीचा प्रयत्न करू. लवकरच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॅम्पियो, उत्तर कोरियाचे अधिकाऱ्यांची बैठक होईल.  ट्रम्प व किम उन नवीन संबंधाचा विकास, सहकार्य, शांतता, समृद्धी, जग तसेच कोरिया क्षेत्र विकासासाठी कटीबद्ध आहोत. 


डोनाल्ड  जे. ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष अमेरिका.
किम जाेंग उन, प्रमुख. उत्तर कोरिया. 
१२ जून. सेन्टोसा बेट, सिंगापूर.

 

जगात युद्ध तर कोणताही देश करू शकतो, शांततेसाठी धाडस लागते

- बैठकीनंतर आता अमेरिका, उत्तर कोरियाविषयी काय करेल ?
किम उन यांनी संपूर्ण अण्वस्त्र नष्ट करण्याचे वचन दिले आहे. आमचा परस्परांवर विश्वास आहे. उत्तर कोरिया संपूर्ण नि:शस्त्रीकरण करत नाही. तोपर्यंत त्यावरील निर्बंध सुरूच राहतील. तोपर्यंत अमेरिकेचे सैनिकही माघारी बोलावले जाणार आहेत. परंतु अमेरिका कोरिया क्षेत्रतात सैन्य सराव करणार नाही. मी उत्तर कोरियाला जाण्याचे नियोजन करणार आहे. किम यांनाही व्हाईट हाऊसचे निमंत्रण देणार आहे.

 

- उत्तर कोरिया किती दिवसांत अण्वस्त्रे नष्ट करणार ?
त्यासाठी अजून बरेच दिवस जातील. पण कोरियाने संपूर्ण अण्वस्त्रे नष्ट करण्याचे वचन आम्हाला मिळाले आहे. त्याबदल्यात अमेरिकेने कोरिया क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.


- उत्तर कोरियाने नि:शस्त्रीकरण सुरू केल्याचे कसे समजणार ?
किम यांच्यासोबत अण्वस्त्र नष्ट करण्यासंबंधीची खात्रीपूर्वक चर्चा झाली. त्याच्या सत्यतेच्या पडताळणीसाठी एक टीम असेल. त्यात अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय अधिकारीही असतील. किम यांनी महत्त्वाच्या क्षेपणास्त्र इंजिन चाचणी जागेला नष्ट करण्यास सहमती दर्शवली आहे.

 

- क्षेत्रात शांतता कशी प्रस्थापित होईल ?
शांततेची सुरूवात झाली आहे. मला उत्तर कोरियाचे उज्ज्वल भविष्य दिसू लागले आहे. किम या शांतता प्रक्रियेला पुढे घेऊन जातील. ते  वचनावर ठाम राहतील. युद्ध तर कोणीही करेलल. मात्र शांततेसाठी धाडस लागते.

 

- ट्रम्प म्हणाले, किम यांच्या टीमकडे आयपॅड दिसला. ही उत्साह वाढवणारी गोष्ट आहे. ते योग्य मार्गावर आहेत. कोरियाच्या किनारी कोण जाणार नाही , असे ट्रम्प म्हणाले.

 

- ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांच्या राजदूतांमध्ये काम करावे, यास आमचे सध्या प्राधान्य आहे. मी गेल्या २५ तासांपासून झोपलेलो नाही. परंतु माझ्या झोपेपेक्षा हे काम महत्त्वाचे होते, 

 

- ट्रम्प व उन यांनी सोबत लंचही केले. त्यात काकडी, कॉकटेल, बीफ, मिठाई, यांगझोऊ फ्राइड राईस, एक्सआे चिली सॉस, क्रिस्पी पोर्क, पनीर,  परदेशी मद्य, आइस्क्रीम,शॅम्पेनचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...