आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या धमकीनंतर सिरियाच्या तळावर डागली 8 क्षेपणास्त्रे, 14 जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - सिरियातील कथित रासायनिक हल्ल्यानंतर एका हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. यामध्ये इराणी सैनिकासह १४ जण ठार झाले. सिरियाची सरकारी वृत्तसंस्था सनानुसार, सोमवारी सूर्योदयापूर्वी टी-४ हवाई तळावर एकापाठोपाठ एक ८ क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यामागे अमेरिकेचा हात असल्याचे सांगण्यात येते.

 

कारण डुमातील रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिकेने म्हटले होते की, आम्ही हल्ल्यासाठी रशिया व सिरियाई लष्कराला जबाबदार धरतो व त्याचा बदला घेऊच.सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचा सर्वात मोठा सहकारी रशियाने हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचे म्हटले आहे.

 

इदलिब-पूर्व घोउतामध्येच बंडखोर गट शिल्लक

आफरीन : तुर्कस्तान कुर्द बंडखोरांची संस्था वायपीजीला अतिरेकी संघटना व प्रतिबंधित राजकीय गट पीकेकची शाखा मानते. वायपीजी अमेरिकेचा सहकारी गट आहे. त्याने सिरियात आयएस नष्ट करण्यात मुख्य भूमिका बजावली आहे. तुर्कस्तानच्या कारवाईमुळे येथील १५००० लोक निर्वासित झाले आहेत.  
घोउता प्रांत : दमास्कसच्या बाहेर पूर्व गुटा बंडखोरांचा गड आहे. असद सेनेने काही आठवड्यांत येथे हवाई हल्ले व रणगाड्यांद्वारे हल्ले केले. दोन महिन्यांच्या हवाई हल्ल्यात सुमारे २ हजार लोक मारले गेले. या भागात फुटीरतावादी गट जैश-अल-इस्लमचे वर्चस्व आहे. सध्या ९०% पेक्षा जास्त भागावर लष्कराचे नियंत्रण आहे.  

 

डुमामध्ये रासायनिक बॅरल बॉम्ब हेलिकॉप्टरने पाडले : व्हाइट हेल्मेट  

- घोउताच्या डुमामध्ये रासायनिक हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झाला. ५०० जणांवर परिणाम झाला. व्हाइट हेल्मेट संस्थेने मृत मुलांची छायाचित्रे प्रसिद्ध केली.  
- हल्ल्याच्या काही तासांत बंडखोर गट जैश अल इस्लमने गुडघे टेकले. ८ हजार बंडखोर व ४० हजार नागरिक शहर सोडण्यास तयार.  
- सिरियात २०११ पासून यादवी सुरू. आतापर्यंत ३.५ लाख लोक मारले गेले आहेत. लष्कराने आयएस व बंडखोरांच्या ताब्यातील ८०% भाग मुक्त केला आहे.  

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...