आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 13 व्या वर्षी बनला गर्लफ्रेंडच्या मुलाचा बाप; DNA Test मध्ये समोर आले हे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एल्फीचे नाव 2009 मध्ये जगभरात चर्चेत आले होते. त्याच्या 15 वर्षीय गर्लफ्रेंडने एका मुलीला जन्म दिला होता. तेव्हापासून तो जगातील सर्वात कमी वयाचा बाप ठरला. या घटनेची जगात इतकी चर्चा झाली की ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेविड कॅमरॉन यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. ईस्ट अॅसेक्सच्या ईस्टबॉर्नमध्ये राहणाऱ्या एल्फीने ही गोष्टी स्वीकारली होती. यानंतर गार्डियन आणि द सन सह अनेक ब्रिटिश दैनिक आणि माध्यमांनी त्याला जगातील सर्वात छोटा बाप घोषित केले. परंतु, डीएनए चाचणीत सत्य काही औरच निघाले. अख्खे जग त्याला ज्या मुलाचा बाप समजत होते प्रत्यक्षात तो त्याचा नाहीच.


- 2009 मध्ये एल्फीची गर्लफ्रेंड सेंटल (15) हिने एका 3 किलोच्या मुलीला जन्म दिला. त्यावेळी एल्फीने सांगितले होते, की त्याची मुलगी त्याच्यापेक्षा मोठी दिसते. आपले वय कमी असतानाही मुलीसोबत आयुष्यभर राहण्यासाठी तो तयार झाला. सेंटल सुद्धा त्या मुली आणि एल्फीसोबत 2 वर्षे राहिली. त्यावेळी या मुलीचा बाप दुसरीच व्यक्ती असल्याचे त्यांना माहिती नव्हते. 
- या दोन वर्षांत इतर दोन मुलांनी त्या मुलीचे वडील असल्याचा दावा केला होता. त्यावेळी एल्फीची आई निकोलाने त्यांची डीएनए चाचणी घेतली. त्याच टेस्टमध्ये समोर आले की ज्या मुलीला एल्फी आपली मानून सांभाळत होता ती त्याची नव्हतीच. यानंतर त्याची गर्लफ्रेंड मुलीला घेऊन आपल्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली. तसेच एल्फी सुद्धा आपल्या पालकांच्या घरी परतला. 


मग कोण होता बाप?
- एल्फीच्या रिपोर्टमध्ये तो बाप नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणखी एक मुलगा बेकर समोर आला. तो त्या मुलीच्या जन्माच्या वेळी 13 वर्षांचा होता. त्याने नकळतपणे सेंटलचा कौमार्यभंग केला. ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असे म्हटले. 
- टेलरने सांगितले, की सेंटलचे त्याच्यासह अनेक मुलांसोबत अफेअर होते. ती कुठल्याही मुलासोबत शारीरिक संबंध ठेवताना प्रोटेक्शन वापरू देत नव्हती. ती नेहमीच दुसऱ्या सकाळी गर्भनिरोधक गोळी घेत होती. 
- आणखी एक मुलगा रिचर्डने दावा केला की तोच सेंटलच्या मुलीचा बाप आहे. तिच्या जन्माच्या वेळी त्याचे वय 16 वर्षे होते. सेंटलने मुलीला जन्म दिला, तेव्हापासूनच तिचे कुटुंबीय या मुलीचे डोळे तुझा मित्र रिचर्डसारखे आहेत असे म्हटले होते. 


एका अफवेने उद्ध्वस्त केले आयुष्य
4 वर्षांपूर्वी एल्फी 18 वर्षांचा झाला. तेव्हा त्याने द सनला एक मुलाखत दिली. त्यामध्ये बोलताना सेंटलच्या संपर्कात आलो ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. त्या अफवांमुळे आपल्याला शाळा सोडावी लागली. तो कुठेही काम करू शकत नाही. तसेच आपल्या आयुष्यातून इतर लहान मुलांनी आदर्श घ्यावा आणि मी केलेल्या चुका त्यांनी करू नये असे एल्फी म्हणाला.

 

पुढील स्लाइड्सवर, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...