आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये 18 वर्षीय तरुणीला अटक; सोशल मीडियावर Dance Video पोस्ट केल्याने कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहराण - इराणमध्ये एका 18 वर्षीय तरुणीला इंस्टाग्रामवर डान्स व्हिडिओ पोस्ट केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मायेदाह होजाब्री असे या तरुणीचे नाव असून ती एक मॉडेल आणि डान्सर आहे. इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. यानंतर तिच्याकडून आपला गुन्हा कबूल केल्याचा व्हिडिओ देखील जारी करण्यात आला. आपल्याकडून नैतिकतेचे उल्लंघन झाले असून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असे ती सांगते. पंरतु, या तरुणीकडून हा व्हिडिओ बळजबरी करून घेतला असा संशय व्यक्त केला जात आहे. 


300 व्हिडिओ केले पोस्ट
इंस्टाग्रामवर 46 हजार फॉलोअर्स असलेल्या मायेदाह हिने आतापर्यंत 300 व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यापैकी अनेक व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसून येते. इराणमध्ये कट्टर इस्लामिक कायद्यांचे पालन केले जाते. यात प्रत्येक महिलेला आपल्या हिजाब घालणे बंधनकारक आहे. हिजाबमध्ये कुणाचे केसही दिसू नये असा नियम आहे. पोलिसांनी तिच्या आणि तिच्यासारख्या इतर सोशल मीडिया अकाउंट कारवाई करून बंद करणार असल्याचे सांगितले आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि तिचा डान्सिंग व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...