आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यात एक जाडजूड महिला एका युवकाला मागून काठीने जोरदार फटके देताना दिसून येते. त्या युवकाला कुठल्याही प्रकारची शिक्षा दिली जात नाही. प्रत्यक्षात ती एक परमपरा आहे. दक्षिण अमेरिकन राष्ट्र पेरू येथे लग्नापूर्वी जावयाला अशी मारहाण केली जाते असे त्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले जात आहे.
काय आहे या व्हिडिओमध्ये?
- व्हिडिओमध्ये एक युवक टेबलाला हात टेकून वाकतो आणि एक धष्टपुष्ट महिला त्याला मागून छडीने जोरदार मारहाण करते.
- असह्य वेदना त्या युवकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतात. तरीही तो त्या महिलेचा विरोध करत नाही. तर आणखी मार खाण्यासाठी पोझिशन घेतो.
- मागे एका बाजूला जास्त मार लागल्याचे पाहता तो दुसऱ्या बाजूने मारावे अशी विनंती करतो. यानंतर महिला दुसऱ्या बाजूला येते आणि पुन्हा फटके द्यायला सुरुवात करते.
- सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, या व्हिडिओमध्ये मार खाणारा युवक होणारा जावई आहे. तसेच त्याला मागून काठ्यांनी मारहाण करणारी महिला त्याची होणारी सासू आहे.
- आपला होणारा जावई आयुष्यात किती त्रास सहन करू शकतो. तसेच त्याच्यासोबत आपल्या मुलीचा विवाह करावा इतका तो मजबूत आहे का याची ही चाचणी आहे.
- सोशल मीडियावर देण्यात आलेल्या या माहितीची शहनिशा होऊ शकली नाही. तरीही, अतिशय विनम्रतेने मार खाणाऱ्या या युवकाचा व्हिडिओ लोक वारंवार पाहत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, होणाऱ्या जावयाला फटके देणाऱ्या सासूचा व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.