आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळताना वॉशिंग मशीनमध्ये अडकली चिमुकली, पाणीही भरले; आईने अनुभव मांडत केले सर्वांना Alert

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील कोलरॅडो प्रांतात राहणाऱ्या लिंडसे मॅकायव्हरने आपल्या मुलीला जिवंत वाचवल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. तसेच जगभरातील पालकांना अॅलर्ट केले आहे. लिंडसेची 3 वर्षीय मुलगी खेळताना वॉशिंग मशीनमध्ये अडकली होती. त्यामध्ये पाणी देखील भरण्यास सुरुवात झाली होती. मशीनमधून मुलीला बाहेर कसे काढले आणि पालकांनी अशा वेळी काय करावे याचे सल्ले लिंडसेने दिले आहेत. लिंडसेच्या या फेसबूक पोस्टचे खूप कौतुक केले जात. सोबतच, त्या पोस्टला आतापर्यंत 80 हजार कॉमेंट आले आहेत. 


तळघरात होते वॉशिंग मशीन
लिंडसेने लिहिलेल्या पोस्टनुसार, तिला 3 लहान-लहान मुले-मुली आहेत. 8 जुलै रोजी तिच्या घरात पती फ्रंट लोड वॉशिंग मशीन घेऊन आले होते. एकदा ती झोपलेली असताना तिचा 4 वर्षांचा मुलगा अचानक रडत-रडत तिच्याकडे आला आणि आपली छोटी बहिण मशीनमध्ये अडकल्याचे त्याने सांगितले. लिंडसे मुलाचे म्हणणे ऐकताच बेसमेंटमध्ये धावून गेली. तेथे जाऊन पाहिले, तेव्हा मशीनमध्ये पाणी भरत होते आणि तीन वर्षांची मुलगी त्यामध्ये अडकली होती. पाहताक्षणी तिने पावर कट केले, त्यातून मशीन वेळीच ऑफ झाले. या घटनेत मुलीला थोड्या जखमा झाल्या. परंतु, तिचा जीव वाचला आहे. 


मशीनमध्ये होते चाइल्ड लॉक ऑप्शन
अपघातानंतर लिंडसेने वॉशिंग मशीनची बारकाइने पाहणी केली. त्यावेळी मशीनमध्ये एक चाइल्ड लॉकचे ऑप्शन मिळाले. चाइल्ड लॉक अॅक्टिव्ह असल्यास मशीन पॉवर ऑन होणार नाही. अन्यथा कुठलेही लहान मूल सहज फ्रंट लोडचे झाकण उघडून त्यामध्ये जाऊन बसू शकते. फेसबूक पोस्टच्या लिंडसेने पालकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. प्रत्येक लहान मुलगा किंवा मुलीला वॉशिंग मशीनचे झाकण उघडण्याचे कुतुहल असते. अनेकवेळा एकट्यात राहताना ते दुस्साहस करण्याचा प्रयत्न करतात. अशात नेहमीच आपल्या वॉशिंग मशीनच्या डोरला खासकरून फ्रंट डोर वॉशिंग मशीनचे झाकण नेहमीच सेफ्टी लॉक असावे. सेफ्टी लॉक नसेल तर कृत्रिमरित्या त्यावर लावावे. लिंडसेने अपघात झाल्यानंतर हे लॉक लावले आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...