आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बेवारस कुत्र्यासाठी महाकाय अजगराशी भिडली ही पोरं! असा वाचवला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - थायलंडमध्ये काढलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही किशोरवयीन मुले अजगराशी झुंज देताना दिसून येत आहेत. प्रत्यक्षात, या अजगराने एका बेवारस श्वानाला आपल्या विळख्यात घेऊन खाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ही मुले अजगराशी जाऊन भिडली. अखेर या संघर्षात या हट्टी मुलांचा विजय झाला आणि अजगर त्या श्वानाला सोडून पळाला. 

 

काय आहे व्हिडिओमध्ये..?
- व्हिडिओमध्ये एक कुत्र्याला विशालकाय अजगराने अतिशय घट्ट असे धरले आहे. त्याचवेळी स्थानिक मुले त्या अजगराला काठ्यांनी मारताना दिसून येतात. त्यापैकीच एक अजगराची शेपूट धरतो आणि त्या कुत्र्याला अजगराच्या तावडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. 
- या हट्टी मुलापुढे अजगराने पराभव पत्करला आणि आपल्या जबड्यातून त्या कुत्र्याला सोडून दिले. फेसबूक यूझर अके श्रीसुवानने हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला एक कोटीहून अधिक प्रेक्षक मिळाले आहेत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...