आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Brazilian मॉडेलला हॉटेलमध्ये रात्रभर सहन करावे लागले असे काही, खटला दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलच्या एका आंतरराष्ट्रीय मॉडेलने एका प्रसिद्ध हॉटेलावर खटला दाखल केला आहे. व्हिक्टोरिया सीक्रेट मॉडेल, टॉमी हिलफायगर, राल्फ आणि अशा असंख्य मोठ्या ब्रँडसोबत करार केलेली मॉडेल सब्रीना जेल्स कॅलिफोर्नियात थांबली होती. पाम डेझर्ट असे त्या हॉटेलचे नाव असून तिने आपल्यासाठी एम्बेसी सूट बुक केले होते. याच रुममध्ये तिला रात्रभर ढेंकणांनी त्रास दिला. तिने या प्रकाराला सोशल मीडियावर नरसंहार असे संबोधले आहे. तसेच यासंदर्भातील काही फोटो सुद्धा तिने शेअर केले. 


मॉडेलिंग करिअर खराब झाले...
ब्राझीलची मॉडेल सब्रीना जेल्सने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यामध्ये तिच्या पाय, खांदे, पाठ आणि जवळपास संपूर्ण शरिरावर ढेंकणांनी चावा घेतल्याची चिन्हे दिसून आली. इतके महागडे आणि आलीशान हॉटेल असतानाही ढेंकूण आलेच कसे असा जाब तिने विचारला. सोबतच या घटनेमुळे आपल्या मॉडेलिंग करिअरवर वाइट परिणाम झाला असे आरोप सब्रीनाने लावले. सब्रीनाने या हॉटेलच्या विरोधात भरपाई आणि कारवाई अशा दोन्ही स्वरुपांच्या मागणीसह खटला दाखल केला आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...