आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: दुर्लक्ष करू नका तळहातावर अशी गाठ, मरता-मरता वाचला हा युवक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - दातांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर आपल्याला गंभीर हृदयविकार होऊ शकतो. ऐकूण आश्चर्य होत असेल परंतु सत्य हेच आहे. न्यू मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, एका 27 वर्षीय तरुणाला याच कारणामुळे जीवघेणे हार्ट इन्फेक्शन झाले. सुरुवातीला या तरुणाला आपल्या तळहातावर खाज सुरू झाली. काही दिवसांतच त्या खाजेच्या जागी एक निळी आणि लालसर अशी गाठ तयार झाली. ही गाठ कडक नव्हती. तसेच त्यामध्ये हालचाली सुद्धा जाणवल्या. हृदयाच्या स्पंदनांसह त्या गाठीत सुद्धा कंपन सुरू झाले होते. त्यावर युवक प्रचंड घाबरला आणि त्याने थेट रुग्णालय गाठले. 


नेमके काय झाले?
- डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, त्या युवकाच्या हातावर आलेली गाठ एक रक्तवाहिनी (Blood Vessel) होती. इन्फेक्शन झाल्याने त्याच्या हातातील रक्तवाहिनी फुगली होती. सखोल आरोग्य तपास केल्यानंतर याचे कारण समोर आले आहे.
- रुग्णाने डॉक्टरांना सांगितल्याप्रमाणे, हातावर त्याला असह्य वेदना सुरू झाल्या होत्या. सोबतच, 6 आठवड्यांत ताप, भूख न लागणे आणि पोटाच्या डावीकडे वेदना अशा तक्रारी होत्या. सोबतच, त्याचे वजन सुद्धा तब्बल 12 किलोंनी कमी झाले होते. 
- डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड केल्यानंतर हृदयाच्या वॉल्वमध्ये इन्फेक्शन (endocarditis) झाल्याचे निष्पन्न झाले. हेच वॉल्व शरीराच्या मुख्य वाहिकेत रक्त पुरवठा करत असते. हे इन्फेक्शन Streptococcus नावाच्या बॅक्टेरियामुळे झाले होते. प्रामुख्याने हा बॅक्टेरिया शरीरात तोंडातून पोहोचतो. डॉक्टरांनी तत्काळ रुग्णावर शस्त्रक्रिया केली आणि रक्तवाहिनी दुरुस्त करून त्याचा जीव वाचवला. 

 

बातम्या आणखी आहेत...