आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मक्का मशीदीच्या छतावरून French नागरिकाची आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मक्का - इस्लामचे सर्वात पवित्र शहर मक्का येथील ग्रॅन्ड मक्का मशीदीमध्ये आत्महत्येचा प्रकार घडला आहे. हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती असलेल्या मशीदीच्या छतावरून त्याने अचानक उडी मारली. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तो आपल्याच देशाचा नागरिक असल्याचे म्हटले आहे. परंतु, ती व्यक्ती नेमकी कोण होती, त्याचे नाव काय आणि त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपला आहे. त्यामध्ये ही व्यक्ती छतावरून गर्दीत उडी मारताना आणि त्याचा मृतदेह घेऊन जात असताना कर्मचारी दिसत आहेत. 


पुढील स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...