आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Video: असं कुणी आइसक्रीम देतं का राव! पाहून आवरणार नाही हसू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - लहान मुलांना आइसक्रीमचे खास आकर्षण असते. ते चावावे लागत नाही आणि थंडावा देऊन जातात. त्यामुळे, दात नसलेल्या चिमुरड्यांनाही ते खूप आवडतात. परंतु, आइसक्रीम मिळवणे इतकेही अवघड ठरू शकते याचा अनुभव या एका चिमुकल्याला आला आहे. एका अरब देशात काढलेल्या या व्हिडिओमध्ये पालक आपल्या चिमुकल्याला पुढे करून त्याचा व्हिडिओ करतात. त्यामध्ये आइसक्रीम विक्रेत्याची स्टाइल व्हायरल होत आहे. वेळोवेळी हा मुलगा आइसक्रीम घेण्याचा प्रयत्न करतो. आणि विक्रेता पुन्हा-पुन्हा त्याच्या हातात आइसक्रीम देऊन अगदी चलाखीने परत घेतो. यावेळी त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर आलेले एक्सप्रेशन सर्वांना आवडत आहेत. एकदा तर विक्रेत्याने आइसक्रीम जमीनीवर सांडल्याचा बनाव केला. त्यावर सुद्धा तो निष्पाप खाली आइसक्रीम शोधत बसतो. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो...