आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीने उतरवला दाढीचा Insurance, लोकेशने शेअर केला Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या दाढीची त्याच्या चाहत्यांमध्ये विशेष क्रेझ आहे. IPL मध्ये त्याने सुद्धा एका मुलाखतीमध्ये दाढीविषयी आपले प्रेम व्यक्त केले होते. ही दाढी आपण काढणार नाही असेही विराटने म्हटले होते. आता याच विराटने कथितरीत्या आपल्या दाढीचा विमा उतरवला आहे. हा खुलासा त्याचाच सहकारी लोकेश राहुलने एक व्हिडिओ शेअर करून केला आहे. एक क्लिप शेअर करताना आता विराटने दाढीचा विमा उतरवले असे कॅप्शन लोकेशने दिले. 

 

व्हिडिओमध्ये काय? 
- क्रिकेटर लोकेश राहुलने एक सीसीटीव्ही व्हिडिओची क्लिप शेअर केली आहे. त्यामध्ये विराट एका ठिकाणी बसलेला आहे. तर एक व्यक्ती त्याची दाढी टच करण्यासाठी परवानगी मागत असल्याचे दिसून येतो. दुसरी व्यक्ती विराटचे वेग-वेगळ्या अँगलने फोटो घेत आहे. 
- विराटच्या दाढीला हात लावणारी व्यक्ती त्या दाढीचे मोजमाप करतो. दोघांचेही काम झाल्यानंतर ते एक फाइल काढतात. तसेच काही कागदपत्रांवर विराट कोहलीच्या स्वाक्षऱ्या घेतात. 
- या व्हिडिओला कॅप्शन देत लोकेश राहुलने लिहिले, हाहा, "मला महिती होते की तुझे दाढीवर खूप प्रेम आहे. पण, आताच मला कळाले की तू दाढीचा विमा उतरवला. तुझे दाढीवरचे प्रेम सिद्ध झाले."
- हे ट्वीट लोकेशने खरोखर फॅक्ट मांडण्यासाठी केले होते, की थट्टा-मस्करीचा भाग म्हणून हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सोबतच, त्याने ट्वीट करताना स्मायली सुद्धा दिले आहेत. त्यातही विराट किंवा इतर कुणीही दाढीच्या विम्याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 


पुढील स्लाइडवर पाहा, यासंदर्भातील व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...