आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Street Fight मध्ये चावून तोडले प्रतिस्पर्धीचे कान; पाहा धक्कादायक VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर सध्या स्ट्रीट फायटिंगचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका फायटररने आपल्या प्रतिस्पर्धीचे कान दातांनी तोडून फेकले. हे लोक रस्त्यावर लढत होते. ती फायटिंग गंमत म्हणून सुरू झाली होती की शर्यत लावण्यात आली होती हे अजुन स्पष्ट झाले नाही. सुरुवातीला हे लोक एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारतात. त्याचवेळी एकमेकांचा गळा धरून पाडण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी हा धक्कादायक प्रकार घडला. 


व्हिडिओ शूट करणारा माणूस त्या दोघांना सुद्धा चिअर करत होता. त्यांना एमकेकांना मारण्यासाठी प्रवृत्त करत होता. त्याने केलेली फायटिंगची कॉमेंट्री व्हिडिओमध्ये ऐकायला येते. स्ट्रीट फाइटमध्ये दोघांना भडकावण्यासाठी तो बॅलबोआ-बॅलबोआ असे ओरडत राहतो आणि मोठ-मोठ्या हसतो. त्याचवेळी एकाने दुसऱ्याची मान धरली. सुटका शक्य नसल्याचे पाहता दुसऱ्याने त्याचे कान आपल्या दातांमध्ये पकडले. यावर व्हिडिओ शूट करणारा त्याला करू नकोस, करू नकोस असे वारंवार आवाहन करतो. मात्र, काही सेकंदात तो फायटर त्या व्यक्तीचे कान दातांनी तोडून थुंकतो. व्हिडिओमध्ये ते फेकलेले कान सुद्धा दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...