आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर वाचवण्यासाठी बुलडोझरला जाऊन भिडले हे मुके जनावर, Video झाला Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - घरावर हातोडा पडतो तेव्हा केवळ माणसंच नव्हे, तर जनावरांना सुद्धा तेवढीच पीडा होत असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून नक्कीच या गोष्टीवर आपला विश्वास बसेल. हा व्हिडिओ इंडोनेशियात टिपण्यात आला आहे. यामध्ये एक ओरँगुटॅन आपले घर वाचवण्यासाठी बुलडोझर समोर गेला. एवढेच काय, तर तो आपल्या घरट्यासाठी त्या मोठ्या मशीनीशी जाऊन भिडला. हा व्हिडिओ 2013 चा असला तरीही वाढते शहरीकरण आणि जंगल उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाच्या जमातीसाठी हा नक्कीच डोळे उघडणारा आहे.


विलुप्त होण्याच्या मार्गावर ओरँगुटॅन
- एक्सपर्ट्सनुसार, जगभरात वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे झपाट्याने जंगले नष्ट केली जात आहेत. साऱ्या जगातील एकूणच जंगलांचा 10 वा भाग गेल्या 20 वर्षांत नष्ट झाला आहे. 
- एका संशोधनाच्या आकडेवारीप्रमाणे, जंगले नष्ट होत असल्याने त्यामध्ये राहणाऱ्या 50 हजार जनावरांच्या प्रजाती दरवर्षी लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. अर्थातच दररोज 137 प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आहे.


पुढील स्लाइडवर पाहा, हा भावनिक व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...