आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियात Hidden कॅमेऱ्यांची दहशत, पॉर्न साइट्सवर अपलोड होत आहेत Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - दक्षिण कोरियात बस, रेल्वे स्टेशन, मॉल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्कर्ट घालून फिरणे कठिण झाले आहे. या देशात दररोज सामान्य महिलांचे असंख्य व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड केले जात आहेत. गर्दीचा गैरफायदा घेत कुणीही त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो आणि व्हिडिओ बनवत आहेत. सार्वजनिक ठिकाणी चप्पल बुटांमध्ये छुपे कॅमेरे लावून काही समाजकंटक महिलांचे अश्लील फोटो काढत आहेत. राजधानी सेऊलमध्ये अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली. यात अनेक आरोपींना लोकांनी भर रस्त्यावर रंगेहात पकडून मारहाणही केली. परंतु, अशा प्रकारच्या घटना गर्दीचा गैरफायदा घेऊन होत असल्याने त्या कमी होत नाहीत. 


18 हजार महिला उतरल्या रस्त्यावर
गेल्या आठवड्यातच राजधानी सेऊलमध्ये 18 हजारांहून अधिक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांच्या हातात मोठ-मोठे बॅनर होते. त्या सर्व महिला आपल्या परवानगीशिवाय आणि अश्लील फोटो काढणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करत होत्या. या महिलांच्या हातांमध्ये असलेल्या बॅनरवर "माझे आयुष्य तुमचे पॉर्न नाही" असे लिहिले होते. सार्वजनिक ठिकाणी केवळ मोबाईलच नव्हे, तर बूट, चप्पल आणि बॅगांमध्ये कॅमेरे लपवून महिलांचे अश्लील फोटो काढले जात आहेत. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे ईन यांनी या आंदोलनाची गंभीर दखल घेतली. तसेच अश्लील फोटो काढणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...