आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमऱ्यात कैद झाला ढगफुटीचा नजारा, पाहा Cloud Burst होतो तेव्हा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅनशनल डेस्क - आतापर्यंत आपण ढगफुटी (Cloud Burst) संदर्भात ऐकले असेल. यातून झालेल्या नुकसाननंतरचे चित्रही पाहिले असेल. परंतु, खरोखर ढग फुटतात तेव्हा नेमके काय घडते हे आम्ही आपल्याला दाखवत आहोत. ऑस्ट्रियात अल्पाइन लेकवर ढगफुटीचा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ स्वित्झरलंडचे फोटोग्राफर पीटर मेर यांनी बनवला. त्यांनी टाइम लॅप्समध्ये तो बनवला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना पीटर यांनी या दुर्मिळ क्षणाला स्वर्गातून आलेली सुनामी Tsunami from Heaven असे नाव दिले आहे. ते पुढे लिहितात, अतिशय दुर्मिळ अशा नैसर्गिक घटना सगळेच कॅमेऱ्यात कैद करू शकत नाहीत, हा अचानक घडलेला प्रसंग आहे. याबाबतीत मी खूप भाग्यवान आहे, की ती संधी मला मिळाली. 


सोशल मीडियावर कॉमेंट्स...
ढगफुटीचा अद्भुत क्षण पाहूण लोक हैराण झाले. एकाने कॉमेंट केली, पाहून असा भास होतो की वादळांवर एक बकेट ठेवण्यात आली होती आणि कुणीतरी अचानक ती पालथी केली. ही तर खरोखर स्वर्गातून आलेली सुनामी आहे. तर काहींनी हा व्हिडिओ फेक असल्याचे आरोप केले. तरीही पीटर यांचा हा व्हिडिओ काही तासांतच 25 हजार लोकांनी शेअर केला. 


ढगफुटी म्हणजे काय?
ढगफुटी पावसाचे रौद्र रूप आहे. पावसात थेंब-थेंब पाणी ढगातून जमीनीवर बरसतो. परंतु, ढगफुटीमध्ये ढगातून तेवढेच पाणी एकाचवेळी अचानक जमीनीवर पडते. अनेकवेळा वादळ आपल्यातील पाण्याचा दबाव सहन करू शकत नाहीत. त्यामुळे, एका विशिष्ट मर्यादेनंतर ते फाटतात आणि पाणी अचानक जमीनीवर पडतो. त्याची तीव्रता इतकी असते की अचानक पूर येतो आणि घरे सुद्धा वाहून निघतात. त्यामुळे, ढगफुटी लोकवस्तीवर पडल्यास मोठे नुकसान पाहायला मिळते. परंतु, ऑस्ट्रियात हा क्षण टिपला त्या ठिकाणी वस्ती नव्हती. त्यामुळे, कुठल्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

 

पुढे पाहा, ढगफुटीचा दुर्मिळ व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...