आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीच्या रस्त्यावर या कपलने केला भन्नाट डान्स; व्हिडिओ VIRAL, अटकेचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबिया कठोर नियम आणि कायद्यांसाठी ओळखल्या जातो. तरीही या देशात एका कपलने भर रस्त्यावर अचानक डान्स सुरू केला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक महिला आणि एक पुरुष फुटपाथावर आपल्याच धुंदीत नाचताना दिसून येतात. तेथून जाणाऱ्या काहींनी त्यांचा व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनमध्ये शूट केला. मात्र, या व्हिडिओमुळे इतका वाद झाला की सौदी अरेबिया प्रशासनाने त्या कपलच्या अटकेचे आदेश जारी केले आहेत. 

 

- रस्त्यावर कपलच्या नाचतानाचा हा व्हिडिओ सौदीच्या असिर प्रांतातील आभा शहरात बनवण्यात आला आहे. 
- या प्रकरणी मीडिया आणि कम्युनिकेशन ऑफिसचे हेड प्रिंस साद अल थाबेत यांनी त्या दोघांच्या अटकेचे आदेश बजावले आहेत. 
- सरकारने दिलेल्या जाहिरनाम्यात त्या कपलवर देशाचा शिष्टाचार भंग, परमपरा आणि नितीमत्तेचे उल्लंघन इत्यादी आरोप लावण्यात आले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलचा तो वादग्रस्त डान्स व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...