आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीत मोलकरणींवर होतात असे अत्याचार, पाहा तिनेच रेकॉर्ड केलेला मालकाचा VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सर्वात धनाढ्य आखाती देशांपैकी एक सौदी अरेबियात मोलकरणींच्या शोषणाचे वृत्त नेहमीच ऐकायला मिळतात. अशाच एका पीडित मोलकरीणने आपल्या मालकाकडून होणाऱ्या अत्याचाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ही महिला फिलिपाइन्समधून सौदी अरेबियात नोकरी निमित्त गेली होती. त्या ठिकाणी तिला एका घरात काम तर मिळाले. मालकाकडून तिला दररोज अश्लील वर्तनाला सामोरे जावे लागत होते. तिने आपल्या मालकाच्या कृत्यांना कंटाळून शेवटी त्याचा व्हिडिओ तयार केला.


काय आहे प्रकरण व व्हिडिओमध्ये नेमके काय?
> फिलिपाइन्सहून सौदी अरेबियात एका घरात काम करणारी महिला आपल्या मालकाकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळली होती. काहीही काम करत असताना त्या घराचा मालक अचानक येऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. ती एकटी सापडताच तिच्यावर अत्याचार करायचा.
> या व्हिडिओमध्ये सुद्धा ती कपडे इस्त्री करत होती. ती एकटी असल्याचे पाहता अचानक मालक जवळ गेला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तिने वारंवार त्याचे हात झटकले आणि दूर जाण्याचा देखील प्रयत्न केला. पण, तो काहीही ऐकूण घेण्यास तयार नव्हता. त्याने आपले कपडे काढण्यासही सुरुवात केली. 
> अखेर पीडितेच्या प्रतिकारामुळे गुडघे टेकत तो नराधम त्या खोलीतून निघून गेला. मात्र, यानंतरही तो कधीही येऊन बळजबरी करू शकतो अशी भिती तिला आहे. नराधम खोलीतून बाहेर निघाल्यानंतर तिने कॅमेरा बंद केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून त्याला एक्सपोझ केले. यापूर्वी असंख्यवेळा त्या मालकाने पीडित मोलकरीणच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळेच, त्याचा चेहरा जगाला दाखवण्यासाठी तिने हा निर्णय घेतला. 
> तिने हा व्हिडिओ सौदीतच काम करणाऱ्या आपल्या पुरुष मित्राला सुद्धा पाठवला. या दोघांनी मिळून पोलिसांत तक्रार करण्याचे प्रयत्न केले. सौदीत मोलकरणींवर अत्याचाराचे असंख्य तक्रारी केल्या जातात. पण, अशा प्रकरणांवर प्रशासनाकडून फारसे लक्ष घातले जात नाही.


पुढील स्लाइड्सवर पाहा, तिने रेकॉर्ड केलेला संपूर्ण व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...