आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking VIDEO: आईच्या अंत्यविधीत डोक्यावर शवपेटी पडल्याने मुलाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इंडोनेशियात एका आईच्या अंत्यविधीचे ताबूत कोसळल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुलावेसी बेटावर राहणारा 40 सामेन कोंडोरुरा आपल्या नातेवाइकांसह आईच्या अंत्यविधीचे कार्यक्रम पार पाडत होता. स्थानिक परमपरेनुसार, त्या महिलेची शवपेटी एका उंच ठिकाणी ठेवली जात होती. त्याचवेळी हा अपघात घडला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. 


व्हिडिओमध्ये काय?
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेवर रविवारी अंत्यसंस्काराचे विधी सुरू होते. यात डझनभर लोक ती शवपेटी बांबूंनी बांधलेल्या एका उंच ठिकाणी (लक्कियान) बांबूच्याच पायऱ्यांवरून जात होते. यात तिच्या मुलाचाही समावेश होता. 
- लोकांचा अतिरिक्त भार बांबूच्या पायऱ्या सहन करू शकल्या नाहीत. तसेच पायऱ्या तुटल्या आणि लोक शवपेटीसह खाली पडले. ही शवपेटी त्या मृत महिलेच्या मुलाच्या डोक्यावर पडली. परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यांनी तातडीने गंभीर जखमी अवस्थेत सामेनला रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्या आईच्या शेजारीच तिच्या मुलाचा सुद्धा मृतदेह ठेवून अंत्यविधी सुरू करण्यात आल्या आहेत.


गुन्हा दाखल करण्यास कुटुंबियांचा नकार
पोलिसांनी या घटनेची चौकशी केली. त्यामध्ये लक्कियान पर्यंत जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्या मजबूत बांधलेल्या नव्हत्या असा निष्कर्श निघाला. त्या पायऱ्या बांधणाऱ्याने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली. त्यामुळे, त्या व्यक्तिविरोधात कारवाई करता येईल असे पोलिसांनी म्हटले. परंतु, कुटुंबियांनी कुणालाही दोष देण्यास किंवा एफआयआर दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला. 


पुढील स्लाइड्वर पाहा, या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...