आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मगरींवर बसून घोडा-घोडा खेळतात येथील पोरं, हिंस्र जीवाशी जीवाचे नाते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - हा फोटो पाहून विश्वास बसणार नाही परंतु, हे चित्र खरे आहे. पश्चिम आफ्रीकी देश बुर्किना फासोमध्ये माणसं चक्क मगरींसोबत राहतात. तेही इतके सहज की जणू मगरी त्यांच्या घरातील पाळीव प्राणी आहेत. त्यांच्यातील हे नाते काही नवीन नाही. या नात्याला 600 वर्षांचा इतिहास आहे. विशेष म्हणजे, पर्यटकांसाठी आता ही बाब आकर्षणाचा केंद्र ठरली आहे. सर्वात घातक आणि हिंस्र प्राण्यांपैकी एक मगरींसोबत स्थानिकांची कुटुंबियांसारखी वागणूक पाहून पर्यटक हैराण होतात. मगरी कुठल्याही प्रकारच्या पिंजऱ्यात नव्हे, तर चक्क घर आणि अंगणात फिरतात. 

 

अशी आहे आख्यायिका...

- येथील स्थानिकांमध्ये 14 व्या शतकातील एक सत्यकथा लोकप्रीय आहे. बुर्किना फासो येथील बझूले गावात 14 व्या शतकापूर्वी कुणीच राहत नव्हते. त्यावेळी दुष्काळाचा कहर होता. पदो-पदी माणसांचा जीव जात होता. - लोकांच्या मान्यतेनुसार, त्याचवेळी मगरींनी एका महिलेले एक खड्डा दाखवला. त्या ठिकाणी पाण्याचे साठे होते. आसपासच्या लोकांना पाण्याचा स्रोत मिळाला आणि हजारो लोकांचा जीव वाचला. तेव्हापासून आजपर्यंत येथे लोक मगरींसोबत वास्तव्य करत आहेत. 

 

मगरींनाच पूर्वज मानतात हे लोक
- स्थानिक या मगरींची काळजी घेतात. त्यांच्यासाठी पाणी आणि खाण्याची व्यवस्था करतात. मगरींना नुकसान होऊ नये म्हणून लोक त्यांना शिकारींपासून सुद्धा वाचवतात. कारण, मगरींच्या कातडीला फॅशन मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे, हे स्थानिक मगरींच्या संरक्षणासाठी काहीही करू शकतात. 
- केवळ बुर्किना फासोचे लोकच नव्हे, तर आफ्रिकेतील इतर देशांचे लोक सुद्धा मगरींना आपले पूर्वज माणून त्यांचा आदर सत्कार करतात. यापैकी काही मगरींचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...