आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियाच्या Beach वर सापडले विचित्र भीमकाय जीव, रक्ताचे कारंजे पाहून स्थानिक भयभीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता - इंडोनेशियाच्या समुद्र किनाऱ्यावर एक विचित्र आणि भीमकाय जीव वाहून आले आहे. कधीच पाहिला नाही असा जीव पाहून संशोधक सुद्धा हैराण आहेत. या जीवावर गावात विविध प्रकारच्या अफवा उठल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. येथील सेरम येथील हुलुंग बीचवर हा 'समुद्री दानव' सर्वप्रथम मच्छिमारांना दिसून आला. त्यांनी वेळीच याबद्दल गावकऱ्यांना सांगितले आणि पाहता-पाहता लोकांची गर्दी झाली. काहींना वाटले हा व्हेल मासा असावा. परंतु, घटनास्थळी पोहोचलेल्या संशोधकांनी तो व्हेल नसल्याचे सांगितले आहे. या जीवाचा आकार 50 फूट लांब आणि 25 फुट रुंद आहे. 


संशोधकही अवाक...
- समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेल्या या जीवाचे वजन 15 हजार किलोंच्या घरात आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली, त्याचवेळी या जीवातून अचानक रक्ताचे कारंजे फुटले. रक्तामुळे त्याच्या आसपासचा परिसर आणि पाणी लाल झाले. इतके भयंकर दृश्य पाहून लोक भितीने घटनास्थळावरून निघून गेले. यानंतर संशोधकांनी त्याचा तपास सुरू केला. प्राचीन जीवांचे तज्ज्ञ ली कांग चेन यांनी सांगितल्याप्रमाणे, "आम्हालाही हा जीव नेमका कोणता आहे याची माहिती नाही. यावर संशोधन केल्यानंतर खरे काय ते समोर येईल."
- यापूर्वी 2017 मध्ये अशाच प्रकारचा एक जीव ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर पोहोचला होता. त्या जीवाची लांबी 15 फूट होती. एका महिलेने यासंदर्भातील माहिती ट्वीटरवर शेअर केली होती. एक्सपर्ट्सनुसार, इंडोनेशियात आलेला जीव हा बलीन व्हेल असू शकतो. त्याचा आकार आणि एकूणच शरीराची रचना पाहता तो एक मासाच आहे असे संशोधकांनी सांगितले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...