आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: या मुलाने राष्ट्राध्यक्षांना विचारले काय चाललंय मनू; मिळाले असे उत्तर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन आपल्या लुक्स आणि शालीन स्वभवामुळे ओळखले जातात. नुकतेच ते एका कार्यक्रमात गेले असताना एका मुलाने त्यांना चक्क टोपण नावाने हाक मारली. ते मनू नावाने ओळखले जातात. परंतु, राष्ट्राध्यक्षांसोबत सेल्फी काढताना त्या मुलाने हळूच काय चाललंय मनू असे विचारले. ही गोष्ट मॅक्रॉन यांना आवडली नाही. त्यांनी वेळीच त्या मुलाला रोखले आणि मला मनू नाही तर मिस्टर प्रेसिडेंट बोलावे अशी ताकीद त्यांनी दिली. याचवेळी त्यांनी त्या मुलाची शाळा सुद्धा घेतली.

 

काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष?

- राष्ट्राध्यक्ष कार्यक्रम स्थळी थांबलेले विद्यार्थी आणि लहान मुलांची भेट घेण्यासाठी बाहेर आले. त्यांनी सर्वांना हात दाखवला तसेच काहींसोबत हॅन्डशेक आणि सेल्फी सुद्धा घेतला. त्याचवेळी एका विद्यार्थ्याने त्यांना काय चाललंय मनू अशी हाक मारली. एवढेच नव्हे, तर गर्दीत समोर येऊन हात मिळवण्याचा आणि सेल्फी काढण्याचाही प्रयत्न केला.

- राष्ट्राध्यक्षांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी थांबून हॅन्डशेक करण्यास नकार दिला. तसेच मला बोलण्यापूर्वी आपल्या बोलण्याची पद्धत दुुरुस्त करावी. एका राष्ट्राध्याला मिस्टर प्रेसिडेंट किंवा सर म्हणून बोलावे. आधी अभ्यास कर. मुलाला आपली चूक कळाली आणि त्याने मान खाली घातली. यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढे निघून गेले. त्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत हसतमुखाने सेल्फी काढले. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...