आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video Revealed: जीव धोक्यात टाकून थायलंडच्या फुटबॉलर्सला असे वाचवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - थायलंडच्या थाम लुआंग गुहेत अडकेल्या फुटबॉल टीमला कोचसह बाहेर काढण्यात आले आहे. ते गेल्या 17 दिवसांपासून अन्न-पाण्याविना अडकले होते. मोहिम 2 आठवड्यांपासून सुरू असली तरीही बाहेर काढण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला 3 दिवस लागले. यात शेवटच्या दिवशी कोच एकापोल चांटावांग (25) सह इतर 5 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. ही रेस्क्यू मोहिम नेमकी कशी पार पडली याची उत्सुकता साऱ्या जगात आहे. त्याचाच एक संपूर्ण व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून मोहिम खरोखर किती जीवघेणी होती हे लक्षात येईल. याच मोहिमेत थायलंडच्या एका नेव्ही सील कमांडोला आपला जीव गमवावा लागला आहे. 


मोहिम फत्ते झाल्याची घोषणा नेव्ही सीलच्या कमांडोंनी केली. मोहिम संपल्यानंतर थायलंडच्या नेव्ही सील युनिटतच्या एका अधिकाऱ्याने फेसबूक पोस्ट केली. त्यानुसार, 'सर्व 12 फुटबॉलर्स आणि त्यांच्या कोचला गुहेतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.' ते 23 जून पासून या गुहेत अडकले होते. 


गुहेत 3.2 किमी आत भटकले होते खेळाडू
गुहेच्या तोंडापासून 3.2 किमी दूर ही मुले अडकली होती. यात सर्वत्र पाणी भरले होते. सोबतच आत असलेल्या कयेक किमी लांब अशा भुयारी मार्गांनी भरलेल्या या गुहेत ते आणखी आत जाऊन भटकतील अशी भिती व्यक्त केली जात होती. या मोहिमेत थायलंडसह जपान, अमेरिका, चीन, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचे 90 खलाशी लागले होते. सोबतच इतर 1000 हून अधिक जवान या मोहिमेत त्यांची मदत करत होते. 


प्रत्येकी 2-2 खलाशींवर एकाला बाहेर काढण्याची जबाबदारी
एक-एक मुलाला बाहेर काढण्यासाठी 2-2 खलाशी कामावर लावण्यात आले होते. मुलांना बाहेर काढताना एक त्याच्या मागे राहील आणि दुसरा त्याच्या पुढे असे नियोजन होते. सोबतच या दोन्ही खलाशींच्या पोटाला रोपने या मुलांना बांधून गुहेबाहेर नेण्याचे काम करण्यात आले. त्या दोन्ही खलाशींसोबत ऑक्सिजन टँक सोबतच पाण्यात तरंगत होते. समोर असलेल्या खलाशीच्या हातात त्या सिलेंडरचे नियंत्रण होते. त्या सर्व मुलांना आणि कोचला सुद्धा ऑक्सिजन मास्क आणि वेट सूट घालून बाहेर काढण्यात आले आहे. या मोहिमेला केव्ह मेज-बॉटलनेक असे नाव देण्यात आले. 


अशी आहेत टीममधील सर्वांची नावे
मीडियाने या टीमला सुपर 13 असे नाव दिले आहे. त्यामध्ये टायटन (11), पनुमास सांगदी (13), दुगनपेच प्रोमटेप (13), सोमेपोंग जायवोंग (13), मोंगकोल बूनेइआम (13), नात्तावुत ताकमरोंग (14), प्राजक सुथम (14), एकरात वोंगसुकचन (14), अब्दुल समुन (14), पिपत फो (15), पोर्नचेइ कमुलांग (16), पीरापत सोमपिआंगजई (17) आणि कोच एकापोल चांटावांग (25) यांचा समावेश आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, बचाव मोहिमेचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...