आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा 2 शक्तीशाली नेते वेश्यांवर चर्चा करतात, माझ्याच देशातील वेश्या सुंदर!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील दोन सर्वात शक्तीशाली देश अमेरिका आणि रशियाचे नेते जेव्हा भेटतात तेव्हा कोणत्या विषयावर चर्चा करतात. साहजिकच प्रत्येकाला वाटणार की ते जागतिक प्रश्नांवर जसे कि, व्यापार, दहशतवाद, आर्थिक समस्या आणि सुरक्षा इत्यादी... पण, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जेव्हा भेट झाली, तेव्हा ते चक्क वेश्यांवर चर्चा करत होता. केवळ चर्चाच नव्हे, तर आपल्याच देशातील वेश्या जास्त सुंदर असतात या विषयावर त्यांनी वाद देखील घातला. हा खुलासा एफबीआयचे माजी प्रमुख जेम्स कोमी यांनी केला आहे. त्यांच्या मेमोची काही कागदपत्रे मीडियाच्या हाती लागली आहेत. 

 

- एफबीआयचे माजी प्रमुख जेम्स कोमी यांच्या एका मेमोमध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेचा खुलासा करण्यात आला आहे. 
- दोन्ही देशांमध्ये तणाव असल्याचे वृत्त नेहमीच येत असतात. पण, या नेत्यांच्या चर्चेचा विषय काय असतो हे अतिशय धक्कादायक आहे. 
- कोमी यांच्या मेमोनुसार, ट्रम्प यांनी जेम्स कोमी यांच्याशी चर्चा करताना पुतिन यांचा विषय काढला. रशियातील प्रॉस्टिट्युट जगात सर्वात सुंदर आणि बेस्ट असतात असे पुतिन ट्रम्प यांना बोलले. 
- पण, ट्रम्प यांनी पुतिन यांचा दावा खोडून काढला. तसेच या विषयावर दोन्ही नेत्यांनी वाद देखील घातला असे कोमी म्हणाले आहेत.
- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी पुतिनने मतदानात फेरफार केली असा आरोप लागला होता. त्याच आरोपांवर अमेरिकेच्या संसदेने विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात कोमी यांनी हा मेमो तयार केला होता. 

 

पुतिन यांनी दिला होता दुजोरा
- जेम्स कोमी ज्या मुद्द्यावर बोलत आहेत. तोच विषय पुतिन यांनी 2017 मध्ये सुद्धा काढला होता. "ट्रम्प एक वयोवृद्ध व्यक्ती आहेत जी गेल्या कित्येक वर्षांपासून ब्युटी कॉन्टेस्ट घेत आहे. ट्रम्प यांनी जगभरातील सर्वात सुंदर-सुंदर तरुणी पाहिल्या आहेत."
- पुतिन पुढे म्हणाले, "ट्रम्प एका तरुणीची भेट घेण्यासाठी हॉटेलात जातील अशी मी कल्पना करू शकत नाही. सामाजिकरित्या ही एक निच्च बाब आहे. पण, एक गोष्ट खरी आहे की रशियातील तरुणी जगात सर्वात सुंदर आहेत. ट्रम्प फक्त त्यांची भेट घेऊन परत येतील असे मला वाटत नाही."
- उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी ट्रम्प यांचे पॉर्न स्टार्सशी संपर्क होते. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उतरताना त्यांनी स्टॉर्मी डॅनिएल या पॉर्नस्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी वकीलामार्फत पैसे देण्याचे आश्वासन दिले होते.

 

पुढील स्लाइडवर पाहा, व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...