आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलताच Live जपानी भाषांतर करणारा Viral Gadget, Wifi ची नाही गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोक्यो - परदेशात गेल्यानंतर सर्वात मोठा अडथळा असतो तो भाषेचा... अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये इंग्रजी बोलली जाते. इंग्रजी भाषा किमान ऐकलेली असल्याने काम चालवले जाऊ शकते. परंतु, जपान, चीन किंवा कोरियात गेल्यावर संवाद साधणे एक आव्हान ठरू शकते. हीच गरज लक्षात घेता, जपानच्या ताकुरो योशिदा यांनी एक भाषांतर गॅजेट इली (ili) तयार केले आहे. अगदी पेन ड्राव्हच्या आकाराचे हे गॅजेट आपण लॉकेटप्रमाणे गळ्यात टांगू शकता. आपण बोललेला प्रत्येक इंग्रजीचा शब्द आणि वाक्य तो समोरच्या व्यक्तीला जपानी, मॅन्डेरीन आणि स्पॅनिश भाषेत लाइव्ह ट्रान्सलेट करून सांगणार आहे. या डिव्हाइसचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


वायफाय, इंटरनेटची नाही गरज...
- ताकुरो योशिदा या युवकाने प्रथम गेल्या वर्षी हे गॅजेट तयार केले. तसेच त्याचे समीक्षण करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. त्या व्हिडिओंना इतका प्रतिसाद मिळाला की ते व्हायरल झाले. आता हेच गॅजेट विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे, ili पुन्हा ट्रेन्ड करत आहे. 
- या गॅजेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ते वापरण्यासाठी वायफाय, मोबाईल किंवा कुठल्याही स्वरुपाच्या इंटरनेटची गरज नाही. त्यामुळे, आपण ते विमानात आणि माउंट एव्हरेस्टवर सुद्धा वापरू शकता असा कंपनीचा दावा आहे. 
- एकदा शंभर टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात. यानंतर हे गॅजेट अविरतपणे सलग 3 दिवस वापरता येईल. याचे वजन फक्त 42 ग्रॅम असून आकार एका पेनड्राव्हचा आहे. त्यामुळे, आपण ते गळ्यात टांगून सुद्धा फिरू शकता. 
- इंग्रजी भाषेत बोललेले शब्द अवघ्या 2 सेकंदांत जपानी, मॅन्डेरीन (चिनी) आणि स्पॅनिश भाषेत बदलणारा हा डिव्हाइस लोकांना खूप आवडतो आहे. आपल्या पसंतीची भाषा निवडण्यासाठी यामध्ये 4 प्रकारचे बटन सुद्धा देण्यात आले आहेत. 
- इली खरेदीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत 199 अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 13,500 भारतीय रुपये इतकी आहे. भारतात हे उपलब्ध नसल्याने दुसऱ्या परदेशी वेबसाइटवरून सुद्धा ऑनलाइन मागवता येईल. परंतु, यासाठी पोस्टिंग आणि हॅन्डेलिंग चार्जेस वेगळे आकारले जातील. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...