आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारमध्ये Waitress ला चुकीच्या ठिकाणी लावला हात, धुलाईचा व्हिडिओ Viral

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि शोषणाच्या विरोधात #MeToo कॅम्पेन सुरू असताना आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेच्या धाडसाचे लोक कौतुक करत आहेत. एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये ती वेट्रेस म्हणून कार्यरत आहे. याच दरम्यान, एका ग्राहकाने तिच्या मागून जात असताना तिला चुकीच्या ठिकाणी हात लावला. महिला आपल्यावर होणाऱ्या अत्याचार सहन करत नाहीत. त्या प्रतिकार सुद्धा करू शकतात याचे जिवंत उदाहरण तिने प्रस्तुत केले. तिने जागेवरच त्या व्यक्तीला अडवून मारहाण करत आयुष्यभराची अद्दल घडवली. तिचा हाच व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 


आरोपीला पत्नी, दोन मुलांसमोर अटक
परदेशात ही घटना 30 जून रोजी घडली आहे. व्हिडिओमध्ये एक महिला बार कर्मचारी आपले दैनंदिन काम करताना दिसून येते. त्याचवेळी तिच्या मागून जाणारा एक ग्राहक तिला मागे हात लावतो आणि काहीच केले नसल्याचे ढोंग करून निघण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी महिलेने त्याची गच्ची धरून ओढले आणि धडा शिकवला. हा व्हिडिओ सर्वप्रथम त्या वेट्रेसच्या एका चुलत बहिणीने शेअर केला. तोच आता व्हायरल होत आहे. तिनेच सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा पोलिसांनी पत्ता लावला. तो एक विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पोलिसांनी त्या सर्वांसमोर त्याच्या घरातूनच अटक केली.


पुढील स्लाइडवर पाहा, व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...