आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Greenland च्या गावात पोहोचले भीमकाय हिमखंड; गावकरी घरे सोडून पसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीनलंड : या 300 फूट उंचीच्या हिमनगामुळे सुनामीची भीती

 

ग्रीनलँड - हे छायाचित्र ग्रीनलँडच्या पश्चिमेकडील किनाऱ्यावरील इनारसूट गावाचे आहे. समुद्रकिनाऱ्यावर हिमनदी भेगाळल्यानंतर त्यातून वाहत आलेल्या 300 फूट उंच व 700 फूट रुंद हिमनगामुळे गावातील लोकांची भीतीने गाळण उडाली आहे. त्यांना गाव सोडावे लागले आहे. गावात 180 उंबरे आहेत. हिमनगाचा बर्फ वितळल्यामुळे गावात सुनामी येऊ शकते. हे छोटे गाव पुराच्या पाण्यात उद्ध्वस्त होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या क्षेत्रातील हा सर्वात मोठा हिमनग आहे. पोलिसांचे पथक त्यावर निगराणी ठेवून आहे. हे पथक हेलिकॉप्टरच्या साह्याने या भागात टेहळणीचे काम करत आहे. साहसी खेळात सहभागी होण्यासाठी काही लोक मात्र गावात दडून बसले आहेत. पोलिस त्यांच्या मागावर आहेत. बर्फाचा हा महाकाय तुकडा गावाच्या तोंडावर स्थिर झाला आहे. हिमनगाला भेगा आहेत. एक-दोन दिवसांत होणाऱ्या पावसामुळे धोका होऊ शकतो. पावसाने हिमनग तुटून पडू शकतो, अशी शक्यता आहे. तसे झाल्यास संपूर्ण परिसरात जलप्रलयाची स्थिती निर्माण होऊ शकते.


1 लाख मेट्रिक टन हिमनगात 74 अब्ज लिटर पाणी  
हिमनदीमधून तुटून समुद्रात वाहत जाणाऱ्या महाकाय बर्फाच्या तुकड्याला हिमनग असे म्हटले जाते. या हिमनगाचे सरासरी वजन 1 लाख मेट्रिक टन असते. त्यात किमान 74 अब्ज लिटर पाणी असते. हिमनगाचा 15 ते 25 टक्के भाग पाण्याच्या वर असतो. वातावरण बदलातून हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. 100 वर्षांत हे प्रमाण वेगाने वाढले. त्यामुळे सागरी जलस्तरही वाढला आहे. 


हिमनगाद्वारे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार
सामान्यपणे ध्रुवांवर आढळून येणारे हे बर्फ गोड्या पाण्याचा सर्वात मोठा स्रोत असतो. हिमनगातून 10 लाख लोकांना 5 वर्षे पुरेल एवढे पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळेच पाण्याचा तुटवडा दूर करण्याची यूएई व दक्षिण आफ्रिकेची योजना आहे. त्यासाठी तुटलेल्या हिमनगाला जहाजाने आणण्याची दोन्ही देशांची योजना आहे. 


हिमनगाला धडकूनच टायटॅनिक जहाजाला जलसमाधी मिळाली होती. त्या घटनेनंतर सागरी परिवहनाच्या नऊ मार्गावर निगराणीची व्यवस्था सुरू झाली. त्यातून हिमनगाला टाळता येऊ लागले.

 

बातम्या आणखी आहेत...