आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cancer ग्रस्त सोनालीने प्रथमच शेअर केले केले फोटो, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अभिनेत्री सोनाली बेंद्रेने 4 जुलै रोजी आपण कर्करोगावर उपचार घेत असल्याचा खुलासा करून जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का दिला. आता सोनालीने प्रत्येक दिवस कॅन्सरशी होत असलेली झुंजचा अनुभव काही फोटोंमध्ये व्यक्त केला आहे. यामध्ये तिने कॅन्सरचे आव्हान आणि विजय या दोन्ही गोष्टींवर चर्चा केली. प्रथमच जाहीर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये सोनाली बेंद्रे आत्मविश्वासाने भरलेली दिसून आली. तिच्या प्रत्येक फोटोमध्ये चेहऱ्यावर स्माईल आहे. कर्करोग विरुद्धचा हा लढा आपण आवश्य जिकून असा दृढ आत्मविश्वास तिने व्यक्त केला आहे. 

 

रोज एक आव्हान, एक विजय...
सोनालीने लिहिले, "प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान आणि एक विजय घेऊन येत आहे. त्यामुळे, एक दिवस एक आव्हान घेणार असे ठरवले आहे. मी या सर्वांमध्ये चिकाटीने प्रयत्न करत राहायला शिकत आहे. सोबतच, एक सकारात्मक दृष्टीकोन नेहमी बाळगते. आव्हानांचा सामना करण्याची ही माझी शैली आहे. माझा प्रवास आपल्यासमोर व्यक्त करणे ही सुद्धा त्यातील एक प्रक्रिया आहे. सर्व काही गमावलेले नाही. आणि कुठे ना कुठे कुणीतरी आपल्या भावना समजून घेत आहे."

 

परिस्थिती आल्याशिवाय माणसाला ताकदीची जाणीव होत नाही...
- सोनाली सांगते, माझी आवडती लेखिका Isabel Allende म्हणाली होती, "छुपी शक्ती बाहेर काढण्यासाठी कुणी आपल्याला विवश करत नाही तोपर्यंत आपण किती शक्तीशाली आहोत हे आपल्याला कळतच नाही. दुख, युद्ध, गरज ही माणसाला अभूतपूर्व करण्यासाठी प्रवृत्त करतात. माणसामध्ये संघर्ष करण्याची आणि नाविन्य घडवून आणण्याची क्षमता जबरदस्त आहे."
- सोनालीने आपल्या पोस्टमध्ये आपल्या चाहते आणि शुभचिंतकांचे आभार मानले. अनेकांनी तिला या संघर्षात प्रेरणा देण्यासाठी आपल्या आणि आपल्या नातेवाइकांच्या कॅन्सर विरुद्ध संघर्षाच्या कथा सांगतिल्या. त्यातून खरोखर आपल्याला खूप ऊर्जा मिळाली असे ती म्हणते. सोबत कॅन्सरशी झुंज देणारी मी या जगात एकटी नाही याबद्दल जाणीव करून देण्यासाठी खूप-खूप आभार असेही सोनालीने म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...