आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटलर कधीच विसरला नाही या ज्यू डॉक्टरचे उपकार! नरसंहारात दिले होते संरक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अतिशय क्रूरकर्मा तानाशहाचा समानार्थी शब्द बनलेला अॅडॉल्फ हिटलरने लाखो ज्यू नागरिकांचा नरसंहार केला. जगातून ज्यूंचा नामोनिशाण मिटवण्याची त्याने शपथ घेतली होती. पण, एक ज्यू असा होता ज्याचे उपकार हिटलर कधीच विसरला नाही. जगभरात ज्यूंचा नरसंहार सुरू असताना त्याने त्या डॉक्टरला शोधून काढले. एवढेच नव्हे, तर त्याच्या सुरक्षेसाठी आपलीच रेड आर्मी तैनात केली. त्या डॉक्टरचे नाव एडवर्ड ब्लोच असे होते. त्या डॉक्टरशी हिटलर भावनिकरित्या जुळलेला होता. 


> 1904 मध्ये डॉक्टर एडवर्ड ब्लोच यांचा हिटलर घराण्यातील पहिला संपर्क जुळला तो अॅडॉल्फ हिटरशी. हिटलर तेव्हा 15 वर्षांचा होता आणि फुफ्फुसांच्या गंभीर आजारामुळे अंथरुणाला खिळला होता. 
> हिटलर इतका आजारी होता, की त्याला शालेय शिक्षण सोडून घरी परतावे लागले. जर्मन तानाशहा म्हणून कुप्रसिद्ध असला तरी हिटलर मूळचा ऑस्ट्रियन होता. ऑस्ट्रियातील घरातच स्थानिक डॉक्टर एडवर्ड यांनी हिटरलवर उपचार केले. 
> औषधोपचार करत असतानाच डॉक्टर ब्लोच यांनी हिटलर आणि त्याच्या पालकांचे मनोबल वाढवले. त्यांनी हिटलरचा खोकला, सर्दी, टॉन्सिल्ससह अनेक प्रकारचे रोग दूर केले. काही दिवसांत हिटलर बरा झाला. पण, कुटुंबावर आणखी एक संकट ओढावले. 
> 1907 मध्ये हिटलरची आई क्लारा हिटलर हिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. कर्करोगाची तीव्रता अधिक असल्याने तिचा मृत्यू झाला. पण, हिटलरच्या आईच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत डॉक्टर एडवर्ड कुटुंबियांसोबत होते. त्यांनी क्लाराला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले तसेच कुटुंबियांनाही धीर दिला.
> सर्वात महत्वाचे म्हणजे, ऑस्ट्रियात राहणाऱ्या हिटलरच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय वाइट होती. डॉक्टर एडवर्ड यांनी त्याच गोष्टीची जाणीव ठेवून कधीच या कुटुंबाला फी आकारली नाही. जेव्हा कधी आकारली ती अतिशय अल्पशी... या सर्व गोष्टींनी एडवर्ड यांनी हिटलरसह अख्ख्या कुटुंबियांशी भावनिक नाते जोडले होते. 


हिटलरने असे फेडले उपकार...
> 1908 मध्ये जेव्हा हिटलर 18 वर्षांचा होता. तेव्हा त्याने एडवर्ड ब्लोच यांचे आभार व्यक्त केले. त्यावेळी हिटलरने आपल्या फॅमिली डॉक्टरला एक भावनिक पत्र लिहिले. सोबतच, हातांनी बनवलेले काही गिफ्ट सुद्धा पाठवले. त्या गिफ्टमध्ये हिटलरने हाताने काढलेली डॉक्टर एडवर्ड यांच्या मुलीची एक पेन्टिंग होती. काही दिवसांपूर्वीच ती हरवली होती.
> कालांतराने हिटलर जर्मनीचा सुप्रीम लीडर बनला. तेव्हा देखील अॅडॉल्फ हिटलरने आपल्या प्रिय फॅमिली डॉक्टरची विचारपूस केली होती. एवढेच नव्हे, तर जेव्हा जर्मन आर्मीने जगभरात ज्यूंचा नरसंहार सुरू केला होता. तेव्हा हिटलरने वैयक्तिकरित्या ब्लोच यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. आपल्याला काहीच होणार नाही याची खात्री पटवून दिली. 
> एवढेच नव्हे, तर जर्मनीने 1938 मध्ये ऑस्ट्रिया काबीज केले, तेव्हा ब्लोच यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेत जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुद्धा हिटलरने त्यांच्या सुरळीत स्थलांतराची व्यवस्था केली. प्रत्येक ज्यूला पकडून मारले जात असताना त्या काळातही ब्लोच यांच्या कुटुंबियांनी आपले घर बाजारभावात विकले. 

 

पुढील स्लाइड्वर वाचा, हिटलरबद्दल काय म्हणाले होते डॉक्टर ब्लोच...

बातम्या आणखी आहेत...