आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश कॅबिनेटच्या Whatsapp ग्रुपवर अश्लील Clip, खासदाराला पश्चाताप नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - सभ्य माणसांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटनच्या खासदाराने केलेल्या कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचे खासदार अँड्रू ब्रिजन यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक अश्लील क्लिप पाठवली आहे. हा व्हॉट्सअॅप ग्रुप त्यांच्या मित्रांचा नाही तर ब्रिटनच्या प्रतिष्ठित खासदार, मंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा ग्रुप असून त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. अशात टीकास्त्र सुरू असतानाही त्यांनी आपल्याला क्लिप पाठवल्याचा पश्चाताप नाही असे स्पष्ट केले आहे. 

 

ऊर्जा मंत्री म्हणाल्या...
ऊर्जा मंत्री क्लेअर पेरी व्हॉट्सअॅपवर ही क्लिप पाहून संतापल्या आहेत. त्या म्हणाल्या, मी माझ्या मुलासोबत सोफ्यावर बसले होते. मंत्रालयाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर महत्वाचे मेसेज येतात. अशात मेसेजची टोन वाजताच मी तो उघडला आणि ती क्लिप प्ले झाली. बाजूलाच बसलेल्या माझ्या मुलाने सुद्धा ते पाहिले. हा एक असभ्यपणाचा प्रकार आहे. ती क्लिप पाठवणाऱ्या खासदाराचा जाहीर निषेध असो.


कट्टर उजव्या खासदाराला पश्चाताप नाही
खासदार ब्रिजनवर चोहीकडून टीका होत असतानाही त्यांना कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप वाटत नाही. ते म्हणतात, "खरं, तर ही क्लिप माझ्याकडून चुकून सेंड झाली आहे. हा माझ्या 'जाड फिंगर'ने चुकून केलेल्या की-बोर्ड टाइपिंगचा प्रकार आहे. क्लिपमध्ये अश्लील असे काहीच नाही. पाहा आणि एन्जॉय करा. मूळात पेरी यांनी काहीच बोलू नये. कारण, त्यांनीच आपल्या मुलाला ती क्लिप दाखवली आणि आता अतिश्योक्ती करत आहेत."


काय आहे या क्लिपमध्ये?
एका अमेरिकन अॅक्ट्रेसच्या या क्लिपमध्ये ठिक-ठिकाणी तिचे ब्रेस्ट, बट आणि प्रायव्हेट पार्ट मुद्दाम झूम करू दाखवण्यात आले आहेत. ती रस्त्यावरून जात असते आणि काही तरुण आपल्या स्पोर्ट्सकारने तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. याचवेळी क्लिपमध्ये अश्लीलरीत्या झूम केले जाते. तिचे हावभाव सुद्धा अश्लील आहेत.

बातम्या आणखी आहेत...