आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातेवाइकांच्या मृत्यूनंतर दिली जाते पार्टी, नाच-गाण्यांची लुटतात मज्जा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे ही प्रत्येकासाठी अतिशय दुखद घटना आहे. पण, पश्चिम आफ्रिकेतील देश घाना रिपब्लिकमध्ये लोक याचे सेलिब्रेशन करतात. एका विशिष्ट स्थानिक समुदायाच्या या लोकांमध्ये नातेवाइकांच्या मृत्यूनंतर लोकांना पार्टी देण्याची परमपरा आहे. हा त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे.

 

- घाना येथे ही परमपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. यात घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लोक त्याचा शोक करत नाहीत. उलट नवीन कपडे घालून आणि तयार होऊन उत्सव साजरा करतात. 
- यासाठी ते आपल्या जवळच्या लोकांना आणि शेजाऱ्यांना पार्टीला बोलावतात. यात नाचणे, गाणे, खाणे आणि पिण्यासह मस्तीचे सर्वच प्रकार चालतात. 
- या पार्टीत मृतांचे नातेवाइक त्या व्यक्तीचा फोटो छापलेले कपडे घालतात. घरातील टेबलावर त्याचा एक फोटो देखील ठेवतात. तसेच आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करून त्यांना पार्टीत सहभागी करून घेतात. 
- येथील समुदायावर आदिवासी संस्कृती आणि चाली-रितींचा पगडा आहे. त्यामुळे, हे लोक नातेवाइकांच्या मृत्यूनंतर दिल्या जाणाऱ्या पार्टीत सर्वच सोपस्कर अगदी श्रद्धेने पार पाडतात. 
- 1962 मध्ये इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झालेला देश घानात 56 भाषा बोलल्या जातात. त्यापैकी 9 भाषांना सरकारी मान्यता आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या देशात नातेवाइकाच्या मृत्यूनंतर रंगतात अशा पार्ट्या...

बातम्या आणखी आहेत...