आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

178 वर्षांनंतर ब्रिटिश संसद भवनाची दुरुस्ती, रिकामे करायला 3, दुरुस्तीला लागतील 6 वर्षे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनच्या १००२ वर्षांपूर्वीच्या संसद भवनाची दुरुस्तीसाठी ३० वर्षांपासून सुरू असलेल्या योजनेवर अखेर शिक्कामोर्तब झाले. खासदारांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टरमध्ये संसदेचे कामकाज चालते. ही इमारत १०१६मध्ये उभारण्यात आली. यापूर्वी १७८ वर्षांपूर्वी १८४० मध्ये या इमारतीची दुरुस्ती झाली होती. तेव्हा ३० वर्षे हे काम चालले. आता ही इमारत रिकामी करायला तीन वर्षे लागतील आणि दुरुस्तीसाठी ६ वर्षे. हे काम २०२० मध्ये सुरू करून २०२६मध्ये पूर्ण करण्याची योजना असून तोवर संसद उत्तर आयर्लंडच्या विधानसभेत चालेल. या दुरुस्तीसाठी ३२ हजार कोटी रुपये खर्च होतील.


वेस्टमिंस्टर इमारत बरीच जीर्ण झाली आहे. आता छतातून पाणीही टिपकते. विजेच्या तारा उघड्या होऊन लटकताना दिसतात. याची जबाबदारी असलेल्या संस्थांनी अनेकदा इशारा दिला आहे. याची दुरुस्ती व्हावी म्हणून ३० वर्षांपासून चर्चा होती. मात्र, दुरुस्ती काळात संसदेचे कामकाज चालवायचे कुठे, हा प्रश्न होता. आता कुठे एकमत झाले आहे. हे संसद भवन आता अपुरे पडत होते. सर्वच खासदार उपस्थित असतील तर अनेकांना जागाच मिळत नव्हती. २०१३ मध्ये हे संसद भवन इतरत्र हलवण्यावर चर्चा झाली. मात्र, संसदेचा ऐतिहासिक संदर्भ पाहता हा प्रस्ताव खासदारांनी फेटाळला होता. आम्ही वेळप्रसंगी उभे राहून कामकाजात सहभागी होऊत... परंतु इमारत सोडून इतरत्र जाणर नाही, अशी भावना खासदारांची होती. पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टर थेम्स नदीच्या किनाऱ्यावर असलेली ऐतिहासिक इमारत आहे. ही इमारत अनेक भागांत विभागलेली आहे. यातील एका भागात बिग बेन घड्याळही आहे. यापैकी एका भागात संसदेचे कामकाज चालते. पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...