आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मादुरोंच्या विजयानंतर 14 राजदूत मायदेशी परतले; व्हेनेझुएलन नागरिकांचे आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काराकस - व्हेनेझुएलाचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी रविवारी झालेल्या निवडणुकीत स्वत:ला विजयी घोषित केले. निवडणूक आयोग आणि देशातील सर्वोच्च न्यायालयही मादुरोंनी विकत घेतल्याची टीका करत विरोधकांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने ६७.७% मते मादुराेंना पडल्याचा दावा करत त्यांना विजयी घोषित केले होते.   


मंगळवारी १४ देशांच्या प्रशासनाने आपल्या व्हेनेझुलातील राजदूतांना मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मादुरोंवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे. देशातील अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली असून यासाठी मादुरोंची हुकूमशाही जबाबदार असल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाचे म्हणणे आहे. निवडणूक अवैध असल्याचा आरोपही इतर राष्ट्रांनी केला आहे. मादुरोंच्या विरुद्ध निवडणुकीत त्यांच्याच सोशालिस्ट पार्टी ऑफ व्हेनेझुएलाचे सदस्य हेन्री फाल्कन उभे होते. त्यांना १८ लाख मते पडली आहेत. हेन्री हे गेल्या ६ वर्षांपासून मादुरोच्या एकाधिकारशाहीमुळे विरोधी बाकावर बसतात. इतर विरोधी पक्षांनी मात्र या निवडणुकीकडे पाठ फिरवली होती.  

 

या देशांचा समावेश 
अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडासह १४ देशांनी आपले राजदूत मायदेशी बोलावले आहेत. रविवारी झालेल्या निवडणुकीनंतर अमेरिकेने व्हेनेझुएलावर नवे आर्थिक निर्बंध लादले आहेत. नव्याने निवडणुका घेण्याचा सल्ला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मात्र ५८ लाख मते पडल्याबद्दल मादुरोंचे अभिनंदन केले असून दुसऱ्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...