आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांना कमकुवत समजायचे अल्बर्ट आइन्स्टाइन; म्हणायचे भारतीय लोक 15 मिनिटांपेक्षा जास्त मागचा-पुढचा विचार करू शकत नाहीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारतीय लोक शारीरिक व मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे जगातील महान वैज्ञानिकांपैकी एक अल्बर्ट आइन्स्टाइन यांना वाटत होते. त्यांनी लिहिलेल्या डायरीत या गोष्टी 
नमूद केल्या आहेत. 


डायरीत आइन्स्टाइन म्हणतात की, ‘भारतातील हवापाणी पाहता येथील लोक कमकुवत वाटतात. कुठलीही भारतीय व्यक्ती १५ मिनिटांपेक्षा अधिक मागचा-पुढचा विचार करू शकत नाही. यामागे अानुवंशिक कारणही असू शकते.’ विशेष म्हणजे भारतीयांबद्दल मत व्यक्त करण्याच्या वेळेपर्यंत ते भारतात आलेले नव्हते. श्रीलंकेत काही भारतीयांना ते भेटले होते. त्या आधारावरच त्यांनी त्यांचे मत बनवले होते. आइन्स्टाइन यांना नानाविध ठिकाणी पर्यटनाची आवड होती. या काळात ते ट्रॅव्हल डायरी लिहायचे. ते ज्या ज्या ठिकाणी फिरले तेथील उल्लेख डायरीत राहत होता.


सन १९२२-२३ मध्ये आइन्स्टाइन आशियातील अनेक देशात पर्यटनासाठी निघाले. त्यांनी चीन आणि श्रीलंकेत प्रवास केला आणि डायरीत अनुभव लिहिले. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील आइन्स्टाइन पेपर प्रोजेक्टचे सहायक संचालक जीव रोझेनक्रँज यांनी या डायरीतील काही सारांश पुस्तकाच्या माध्यमातून सार्वजनिक केला आहे. 

 

चिनी लोक मेहनती, पण मला ते यंत्रमानव वाटतात

केवळ भारतच नव्हे तर चीनच्या बाबतीतही आइन्स्टाइन यांचे असेच काहीसे मत होते. ‘येथील लोक खूप मेहनती आहेत. पण मला ते यंत्रमानव वाटतात. येथील लोकांचे राहणीमान खूप घाण असते व ते कमी हुशार असतात.’ श्रीलंकेबाबत ते म्हणत की, ‘चिनी लोकांप्रमाणे श्रीलंकन लोकही घाण राहतात. कमी काम करा आणि गरजा कमी ठेवा या सिद्धांतावर त्यांचा विश्वास आहे.’ 

 

वर्णभेदाविरुद्ध उठवला आवाज 
आइन्स्टाइन यांची प्रतिमा वैज्ञानिक तसेच वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवणारा अशी आहे. सार्वजनिक कार्यक्रमातून ते वर्णभेदाविरुद्ध टीका करायचे. वर्णभेदाला ते ‘सवर्ण लोकांचा आजार’ संबोधायचे. परंतु त्यांच्या डायरीत आशियातील लोकांबद्दल वर्णभेद करणारी टीका केली गेली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...