आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आइंस्टाइनने तरुणीला लिहिलेले प्रेम पत्र, लिलावात मिळाले 4 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - जीनियस शब्दाचा समानार्थी म्हणूनही ओळखल्या जाणारे महान शास्त्रज्ञ अॅल्बर्ट आइंस्टाइन यांनी एका तरुणीला प्रेम पत्र लिहिले होते. अॅल्बर्ट यांनी लिहिलेले या पत्राचा जेरुसलेममध्ये लिलाव झाला आणि त्याला 4 लाख इतकी किंमत मिळाली आहे. ब्रिटिश माध्यम बीबीसीच्या वृत्तानुसार, आइंस्टाइन यांनी हे प्रेम पत्र 1921 मध्ये इटलीतील एका महिला वैज्ञानिकाला लिहिला होता. त्या महिलेने आइंस्टाइन यांना भेटण्सा नकार दिला होता. त्यावेळी ती 22 वर्षांची होती आणि आइंस्टाइन 42 वर्षांचे होते. एलिझाबेटा पिकिनी असे त्या महिलेचे नाव होते. तसेच ती अॅल्बर्ट यांच्या बहिणीच्या घराच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहायची...

 

हे पत्र खरेदी करणाऱ्याने सांगितले, आइंस्टाइन त्या महिलेची भेट घेण्यास इच्छुक होते. पण, आइंस्टाइन एक प्रसिद्ध संशोधक असल्याने ती भेटण्यास संकोच करत होती. आइंस्टाइन यांनी लिहिलेल्या पत्रातून त्यांचे त्या तरुणीवर प्रेम होते हे स्पष्ट होत आहे.

 

पुढे वाचा, त्या पत्रात नेमके काय लिहिले होते आइंस्टाइनने...

बातम्या आणखी आहेत...